AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nayanthara | ‘पुन्हा एकदा व्हिडीओ काढलास तर..’; मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेल्या नयनताराची चाहत्याला धमकी

नयनतारा ही तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती लवकरच शाहरुख खानसोबत 'जवान' या चित्रपट मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nayanthara | 'पुन्हा एकदा व्हिडीओ काढलास तर..'; मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेल्या नयनताराची चाहत्याला धमकी
NayantharaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2023 | 11:01 AM
Share

कांचीपुरम : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नयनतारा नुकतीच पती विग्नेश शिवनसोबत कामाक्षी अम्मन मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. पंगुनी उठीराम (दक्षिण भारतातील लोकांचा सण) या शुभ दिवशी हे जोडपं देवदर्शनासाठी आले होते. मात्र त्याठिकाणी घडलेल्या एका घटनेनंतर वादाला तोंड फुटलं आहे. मंदिर दर्शनाच्या वेळी नयनताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक चाहता नयनताराचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पाहून नयनताराचा संयम सुटला. सांगितल्यानंतरही व्हिडीओ शूट करणाऱ्या चाहत्यावर अखेर ती भडकली. नयनताराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन नुकतेच कुंभकोणमजवळील कामाक्षी अम्मन मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांनी गर्दीत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली होती. नयनतारा आणि विग्नेशभोवती प्रचंड गर्दी जमल्याने त्यांचंही देवदर्शन अपेक्षेप्रमाणे नीट झालं नाही. त्यानंतर जेव्हा ते एका छोट्या मंदिरात नैवेद्य दाखविण्यासाठी गेले, तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. गर्दीला पाहून मंदिराच्या आतच नयनतारा तिचा संयम गमावते.

नयनताराने दिली फोन तोडण्याची धमकी

गर्दीत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गोंधळ घालणाऱ्या चाहत्याला नयनताराने फटकारलं. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवत आणि चाहत्यांमध्ये धक्काबुक्की होत असतानाही पहायला मिळत आहे. यातील एका फ्रेममध्ये विग्नेश चाहत्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे नयनताराचा राग अनावर होतो. अखेर तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्या चाहत्याला ती फोन तोडण्याची धमकी देते. तिच्या याच व्हिडीओवरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नयनतारा ही तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘जवान’ या चित्रपट मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती जयम रवीसोबत ‘इरावन’मध्येही झळकणार आहे.

नयनताराने प्रियकर विग्नेश शिवन याच्याशी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर चार महिन्यांनी या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. उयीर आणि उलगम अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत. 2015 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.