AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh : 35 व्या दिवशी मोठा चमत्कार, ‘हनुमान अंश’ने जगभरात रचला इतिहास, एका दिवसांत इतक्या कोटींची कमाई

Hanuman Ansh : 35 व्या दिवशी देखील 'हनुमान अंश' बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. 'हनुमान अशं' सिनेमाने जगभरात इतिहास रचला आहे. सिनेमाने एका दिवसांत मोठी कमाई केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Hanuman Ansh : 35 व्या दिवशी मोठा चमत्कार, 'हनुमान अंश'ने जगभरात रचला इतिहास, एका दिवसांत इतक्या कोटींची कमाई
Hanuman Ansh
| Updated on: Sep 11, 2026 | 1:17 PM
Share

Hanuman Ansh : नीम करोला बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. विशाल चतुर्वेदी यांनी सिनेमा बनवण्यासाठी आणि शोभिनव सत्या यांना महान संत नीम करोली बाबा यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. एवंढच नाही तर, ‘हनुमान अंश’ सिनेमावर हनुमानाची कृपा सदैव असल्याचं सांगितलं जात आहे. 35 व्या दिवशी देखील ‘हनुमान अंश’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. आता सिनेमा 200 कोटींच्या घरात पोहोचेल असं देखील सांगितलं जात आहे.

सिनेमाचा पहिला दिवस कसाही असला तरी, शेवटचा दिवस आठवणीत राहणारा ठरत आहे. सिनेमाने प्रदर्शनानंतरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी ओपनिंग वीकेंडला केवळ 60 लाख रुपयांचा व्यवसाय केला असला, तरी आता 35 व्या दिवसापर्यंत सिनेमा जगभरात 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, भक्तीपर सिनेमाने 35 दिवसांत जगभरात 192.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनमाने 100 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. जागतिक स्तरावर 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यापासून हा सिनेमा आता केवळ 8 कोटी रुपये दूर आहे. बुधवारी या सिनेमाची एकूण कमाई 180 कोटी रुपये इतकी होती, म्हणजेच एका दिवसात सिनेमाने सुमारे 12 कोटी रुपयांची कमाई केली.

सांगायचं झालं तर, शेभिनव सत्य यांची मुख्य भूमिका असलेला ‘हनुमान अंश’ हा सिनेमाने भारतीय आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर यशाची नवी गाथा रचली आहे. आज सिनेमा परदेशात देखील प्रदर्शित होत आहे. परदेशातील मार्केटमध्ये हा सिनेमा काय चमत्कार घडवतो, हे येणारा काळच सांगेल; मात्र, नीम करोली बाबांच्या चमत्कारांची कथा केवळ भारतापुरती मर्यादित न राहता जगभर पसरली आहे.

हनुमान अंश हा सिनेमा 2026 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमाच्या यादीत टॉप 10 मध्ये सामिल झालं आहे. कमाईच्या बाबतीत, ‘हनुमान अंश’ सिनेमा सध्या ‘टॉक्सिक’, ‘मिर्झापूर: द मुव्ही’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘कॉकटेल 2’ यांना मागे टाकून या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सहाव्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर