LIC ची जाहीरात केली अन् संसार उद्धवस्त झाला… मराठी अभिनेत्रीनं सांगितला अंगावर काटा येईल असा प्रसंग
मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने LIC ची जाहीरात शूट केली होती आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीला गमवावे लागले होते.

मरार्ठी सिनेइंटस्ट्रीतील अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी अनेक चित्रपटातून आणि मालिकेतून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ७१ व्या वर्षीही ते सिनेमा, नाटक आणि मालिकाविश्वात सक्रिय आहे. आता त्यांनी एका मुलाखतीत एका घटनेबद्दल खुलासा केला आहे.
नीना कुळकर्णी म्हणाल्या की,"१९९० च्या दशकात त्यांनी LIC ची जाहीरात केलेली होती. ती मोस्ट आयकॉनिक जाहीरातींपैकी ती एक जाहीरात होती. या जाहीरातीनंतर माझ्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला होता, अनेकांनी मला यावरुन टोमणेही मारले होते."
नीना कुळकर्णी म्हणाल्या "ती खूप सुंदर जाहिरात होती. खूप सुंदर शूट केली गेली होती. या जाहिरातासाठी आधी माझे पती अभिनेते दिलीप कुळकर्णी यांना विचारण्यात आले होते , पण त्यांना ऑथेंटिसीटी हवी होती, नंतर ती जाहीरात मी केली."
"या जाहीरातीनंतर अगदी सहा वर्षातच मी माझ्या पतींना गमावले, त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्या जाहीरातीत मी विधवा महिलेची भूमिका साकारलेली. यामुळे अनेकांनी मला टोमणे मारले. तू असं केलंस म्हणून असं घडलं" असं नीना कुळकर्णी म्हणाल्या.
नीना कुळकर्णी यांच्या आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळीच छाप सोडली आहे. आता नीना कुळकर्णी कोणत्या भूमिकेत दिसतील यासाठी चाहते उत्सुक आहेत.