तारक मेहतामध्ये नव्या दयाबेनची एन्ट्री? दिशा वकानीचा पत्ता कट, अभिनेत्रीने केले मोठे गुपित उघड

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. मालिकेतील काही कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सतत कलाकार हे मालिकेला सोडचिठ्ठी देताना देखील दिसत आहेत.

तारक मेहतामध्ये नव्या दयाबेनची एन्ट्री? दिशा वकानीचा पत्ता कट, अभिनेत्रीने केले मोठे गुपित उघड
| Updated on: Jun 08, 2023 | 8:18 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak mehta ka ooltah chashma) ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. तारक मेहता मालिकेच्या निर्मात्यावर सतत गंभीर आरोप केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे असित कुमार मोदी यांच्यावर आरोप करणारे तारक मेहता मालिकेमधील कलाकार आहेत. या कलाकारांनी काही दिवसांपुर्वीच मालिका सोडलीये. असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्यावर सतत होत असलेले आरोप पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. असित कुमार मोदी हे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. शैलेश लोढा आणि असित कुमार मोदी यांच्यामध्येही वाद झालाय. शैलेश लोढा (Shailesh Lodha) आणि असित कुमार मोदी यांचा वाद थेट कोर्टात पोहचलाय.

शैलेश लोढा यांनी असित कुमार मोदी यांच्यावर काही आरोप केले असतानाच जेनिफर मिस्त्री अर्थात मालिकेतील मिसेस सोढीने असित कुमार मोदीवर धक्कादायक आरोप केले आहेत. इतकेच नाही तर थेट जेनिफर मिस्त्रीने लैंगिक छळाचा आरोप हा असित कुमार मोदी यांच्यावर केला आहे. सेटवर तिच्यासोबत नेहमीच असित कुमार मोदी हे गैरवर्तन करायचे असेही जेनिफर मिस्त्रीने सांगितले.

फक्त जेनिफर मिस्त्री हिच नाही तर मालिकेत बावरीची भूमिका करणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया आणि रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा यांनी देखील असित मोदीवर काही गंभीर आरोप हे केले आहेत. हे सर्व सुरू असतानाच आता एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

तारक मेहता मालिकेचे निर्माता सतत होणाऱ्या आरोपामुळे चर्चेत असतानाच आता दयाबेन चर्चेत आहे. नवीन दयाबेन मालिकेत आणली जात असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. ब्लाॅगर गरिमा गोयल हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गरिमा गोयल ही दयाबेनसारखे वागत आहे. इतकेच नाही तर तिने संपूर्ण लूक देखील दयाबेनसारखा केला आहे.

दयाबेन हिच्यासारखे बसने, बोलणे, जेवण करणे हे सर्व करताना गरिमा गोयल ही दिसत आहे. तब्बल एक दिवस गरिमा गोयल ही दयाबेनच्या लूकमध्ये दिसली. यामुळे एक चर्चा सुरू आहे की, दिशा वकानी ऐवजी आता मालिकेचे निर्माते हे दयाबेनसाठी गरिमा गोयल हिला घेत आहेत. मात्र, या चर्चांवर गरिमा गोयल हिने नकार दिला आहे. आपल्याला एक चॅलेंज मिळाल्याने आपण दयाबेनसारखे राहिल्याचे तिने सांगितले.