प्रियांकाने नशीब काढलं, निक जोनासने जे केलं ते भारतीय नवरे कदाचित करणार नाहीत; चाहतेही पडले प्रेमात!

प्रियांका चोप्राचा पती निक जोनस सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याने प्रियांकाच्या 'द ब्लफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक. यावेळी चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

प्रियांकाने नशीब काढलं, निक जोनासने जे केलं ते भारतीय नवरे कदाचित करणार नाहीत; चाहतेही पडले प्रेमात!
Nick Jonas Priyanka Chopra
| Updated on: Feb 20, 2026 | 2:04 PM

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे हॉलिवूड-बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. ते दोघेही कायमच एकमेकांसोबत खंबीरपणे उभे असतात. प्रियांका चोप्राचा पती निक हा भारतीय संस्कृतीचा आदर करताना दिसतो. आता नुकताच निक जोनसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यात त्याने चक्क प्रियांकाचे मंगळसूत्र हातात ब्रेसलेट म्हणून घातल्याचे पाहायला मिळत आहे. निक जोनसच्या या कृतीने त्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

निक जोनसच्या व्हिडीओत नेमकं काय?

प्रियांका चोप्राचा आगामी द ब्लफ (The Bluff) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निक जोनसने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत निक हा एका वेगळ्या अंदाजात चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. त्याने या चित्रपटापासून प्रेरित होऊन एक ब्लडी मेरी (कॉकटेल) तयार केले आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहण्यासारखा आहे. मी स्वतः हा चित्रपट दोनदा पाहिला आहे. तो अत्यंत रोमांचक आहे, असे निक जोनसने म्हटले आहे.

या व्हिडीओत निक जेव्हा ड्रिंक बनवण्यासाठी जातो. तेव्हा त्याच्या हातात असलेल्या मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. निकने त्याच्या हातात प्रियांका चोप्राचे मंगळसूत्र ब्रेसलेट घातले आहे. त्याने हातात घातलेले मंगळसूत्र पाहून अनेक नेटकऱ्यांनी तसेच भारतीय चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट करण्यास सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

यावर एका नेटकऱ्याने अरे वाह किती मस्त निकने मंगळसूत्र ब्रेसलेट घातले आहे अशी कमेंट केली आहे. तर एकाने जिजू मंगळसूत्र ब्रेसलेट असं म्हणत त्यावर हॉर्ट आणि नजरचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. तर एकाने निक जिजू खरोखरच ग्रीन फ्लॅग (आदर्श पती) आहेत, त्यांनी भारतीय संस्कृतीचा केलेला हा सन्मान पाहून आनंद झाला, असे म्हटले आहे. तर एकाने या माणसाने पुन्हा एकदा आमचे मन जिंकले आहे, तो प्रियांकावर किती प्रेम करतो हे यावरून दिसते, अशी कमेंट केली आहे. दरम्यान यावरुन निक आणि प्रियांकामध्ये असलेले घट्ट नाते पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच त्या दोघांमध्ये एकमेकांप्रति किती आदर आहे, हे देखील पाहायला मिळत आहे.