AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोरा फतेही हिचा नको तो व्हिडीओ समोर, व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्री म्हणाली…

Nora Fatehi : सोशल मीडियावर नको तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोरा फतेही झाली हैराण, फोटो पोस्ट करत म्हणाली..., अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यानंतर नोरा फतेही हिचा देखील व्हिडीओ व्हायरल... सध्या सर्वत्र नोरा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

नोरा फतेही हिचा नको तो व्हिडीओ समोर, व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्री म्हणाली...
| Updated on: Jan 21, 2024 | 11:03 AM
Share

Nora Fatehi : गेल्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओमुळे अनेक अभिनेत्रींचे नको ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेक अभिनेत्री डीपफेक व्हिडीओच्या जाळ्यात अडकल्या आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. पोलिसांनी व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला अटक देखील केली आहे. पण रश्मिका हिच्यानंतर अभिनेत्री नोरा फतेही हिचा देखील डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. रश्मिका, आलिया भट्ट यांच्यानंतर नोरा फतेही देखील डीपफेकच्या जाळ्यात अडकली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नोरा हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. नोरा फतेही हिचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका ऑनलाईन शॉपिंग ब्रँड संबंधीत आहे. व्हिडीओचं सत्य सांगत नोरा हिने संताप देखील व्यक्त केला. सर्वत्र नोरा हिची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये ‘लुलुमेलोन’ नावाचा एक फॅशन ब्रँड दिसत आहे. त्या फॅशन ब्रँडला नोरा प्रमोट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये नोरा हिचा फोटो लागला आहे. शिवाय 60-40 टक्के सूट असल्याचं देखील सांगितलं जात आहे. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली आहे. नोरा फतेहीने व्हिडिओ शेअर करताना फेक असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओ शेअर करताना नोरा फतेही म्हणते, ‘हे पाहिल्यानंतर मलाही धक्का बसला आहे. पण व्हिडीओमध्ये मी नाही…’ व्हिडिओमध्ये, नोरा फतेही ज्या ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे, त्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. नोरा फतेहीने व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच प्रतिक्रिया दिली आणि लोकांना सांगितले की, या प्रमोशनल व्हिडिओशी तिचा काहीही संबंध नाही.

नोरा फतेही हिचे आगामी सिनेमे

नोरा सध्या ‘क्रॅक’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेका विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 23 फेब्रुवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी सिनेमामुळे नोरा सध्या तुफान चर्चेत आहे.

नोरा फक्त सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नोरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.