AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत अश्लील बोल, बीभत्स डान्स..; नोरा फतेहीच्या गाण्यावरून मोठा वाद, अखेर हटवण्याचे आदेश

अशा प्रकारचं गाणं सेन्सॉर बोर्डानेही कसं पारित केलं, असा सवाल ओनीरने उपस्थित केला आहे. "इथे सेन्सॉर बोर्डाकडे 'घुसखोर पंडत'सारख्या चित्रपटावर टीका करण्यासाठी वेळ आहे. आपण खूप विचित्र देशात राहतोय, असं मला वाटतं. व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशनला, आंतरधर्मीय लग्नाला विरोध केला जातो आणि अशा प्रकारच्या मूर्खपणाला परवानगी दिली जाते", अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

अत्यंत अश्लील बोल, बीभत्स डान्स..; नोरा फतेहीच्या गाण्यावरून मोठा वाद, अखेर हटवण्याचे आदेश
Nora Fatehi and Sanjay DuttImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2026 | 6:28 PM
Share

नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित केलेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘केडी- द डेविल’ या कन्नड चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे. या गाण्याचे बोल आणि त्यावरील कोरिओग्राफी अत्यंत अश्लील असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांनंतर आता ‘नॅशनल ह्युमन राइट कमिशन’ने (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) नोटीस बजावली असून त्यानंतर युटयूब आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरून हे गाणं काढून टाकण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, वकील विनीत जिंदाल यांनी सेन्सॉर बोर्ड आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे गाण्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल केल्यानंतर गाण्याला आणखी विरोध होऊ लागला. वकिलांनी या गाण्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

“हे गाणं अत्यंत अश्लील, बीभत्स अभिव्यक्तींनी भरलेलं आहे”, अशा शब्दांत वकील जिंदाल यांनी टीका केली होती. असं असूनही हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या गाम्याचे बोल अत्यंत आक्षेपार्ह आणि सार्वजनिकदृष्ट्या प्रदर्शनासाठी अयोग्य आहे, हे गाणं विशेषत: अल्पवयीन मुलांसाठी अत्यंत अनुचित आहे, अशी बाजू त्यांनी तक्रारीत मांडली होती. त्यांच्या तक्रारीत गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम, संगीतकार अर्जुन जान्या आणि गायिका मंगली यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे यापूर्वीच एक स्वतंत्र फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती.

आनंद ऑडिओकडून हे गाणं हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये युट्यूबवर अपलोड करण्यात आलं होतं. सोमवारी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याचे बोल आणि कोरिओग्राफी पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता तक्रारीनंतर हे गाणं सर्व प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्यात आलं आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी गाण्यावर आणि बॉलिवूडवर टीका केली आहे. “अश्लीलता, लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले डावपेच याबाबतीत बॉलिवूडने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश त्याचा निषेध करत आहे आणि त्यांना धारेवर धरत आहे. पण मला वाटत नाही की त्यांच्यात कसली लाज उरली आहे. अशा प्रकारच्या अश्लीलता आणि बीभत्सतेबाबत आणखी कडक भूमिका घेण्याची गरज आहे. कुटुंबासोबत टीव्ही पाहणंही आता कठीण झालं आहे. बॉलिवूडवर आता कडक जरब बसवावी लागेल”, असं त्या म्हणाल्या.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?