AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onkar Bhojane: अतिशय अनप्रोफेशनल, खोटारडा… दिग्दर्शकाचे ओंकार भोजनेवर गंभीर आरोप

Onkar Bhojane: ओंकार भोजनेवर अनेक आरोप होत आहेत, दिग्दर्शकाने त्याला पुढील चित्रपताट कामच देणार नाही असे म्हणाले आहे.

Onkar Bhojane: अतिशय अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाचे ओंकार भोजनेवर गंभीर आरोप
| Updated on: Sep 25, 2026 | 12:43 PM
Share
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम असून त्यातील कलाकारांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. या कार्यक्रमासह यातल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केलंय. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कलाकार म्हणजे ओंकार भोजने. आपल्या स्किट्सनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजने याने मधल्या काळात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून एग्झिट घेतली होती. त्यानंतर ओंकारने रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली.  आता दिग्दर्शकाने ओंकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ओंकारचा ‘अफरातफरी’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधीच सिनेमाच्या टीममध्ये मोठा राडा झाल्याचे समोर येत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘अफरातफरी’ सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजनेवर गंभीर आरोप केले आहेत. ‘अफरातफरी’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि टीम यांनी मुलाखत दिली. यावेळी सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला ओंकार भोजने यावेळी अनुपस्थित होता. या मुलाखतीत बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकार भोजनेवर टीका केली आणि म्हणाले की,  हे अतिशय अनप्रोफेशनल.”
दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाले की, “जे प्रोफेशनल कलाकार आहेत, ते सगळे बरोबर वेळ पाळतात… आताही संजय नार्वेकर प्रमोशनला येत आहेत, पण, जे नवीन कलाकार आहेत त्यांनी  उदाहरण घ्यावे, ओंकारला आम्ही जूनमध्ये सांगितले होते की, “ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय. माझा EP ने त्याला कॉन्टॅक्ट करत आहेत, मी सुद्धा त्याला अनेक फोन केला होते. पण तो एवढा बिझी आहे की, तो कोणाचेही फोन उचलत नाहीये. कॉल 1 केल्यावर त्याचा एका टेम्प्लेट मेसेज येतो, ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो’ पण गेले चार महिने काय एकही कॉल आलेला नाही.”
मिलिंद कवडे पुढे बोलताना म्हणाले की, “शेवटी, निर्मात्यांनी कंटाळून ओंकारला एक लेटर पाठवलंय की, बाबा रे आम्ही चित्रपट महामंडळात जायचं का? तू लक्षच घालत नाहीये. अजूनही त्याने स्पष्ट सांगितले नाही की तो येणार आहे की नाही… एखाद्या लटकवून ठेवणं म्हणताता. बरं एका सिनेमासाठी निर्मात्याने कोटी रुपये गुंतवलेले असतात. तुम्ही निदान प्रमोशनसाठी एक व्हिडिओ तरी पाठवा. आता मोहन आगाशे सर मध्यंतरी हैदराबादला होते, पण त्यांनी तिथून त्यांचा व्हिडिओ पाठवला. आजही ते स्वतः प्रमोशनला उपस्थित राहिले. त्यामुळे आता मी कानाला खडा लावलाय, मी पुढच्या सिनेमात ओंकारला कास्ट करणार नाही. एक कलाकार म्हणून तो उत्तम आहेच..पण, माणूस म्हणून सॉरी! अतिशय अनप्रोफेशनल… तो सराईत खोटारडा आहे…”, असा आरोप दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केला आहे.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास