#Boycott_Atrangi_Re | अक्षय-सारा-धनुषच्या ‘अतरंगी रे’वर प्रेक्षक संतापले, बंदी घालण्याची मागणी! नेमकं कारण काय?

साऊथचा सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड स्टार्स सारा अली खान आणि अक्षय कुमार यांचा 'अतरंगी रे' (Atrangi Re) हा चित्रपट नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे देशातील एक वर्ग चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे.

#Boycott_Atrangi_Re | अक्षय-सारा-धनुषच्या ‘अतरंगी रे’वर प्रेक्षक संतापले, बंदी घालण्याची मागणी! नेमकं कारण काय?
Atrangi Re
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 11:17 AM

मुंबई : साऊथचा सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड स्टार्स सारा अली खान आणि अक्षय कुमार यांचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) हा चित्रपट नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे देशातील एक वर्ग चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करणार्‍या लोकांचे म्हणणे आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रचार केला जात आहे.

‘बॉयकॉट अतरंगी रे’ ट्विटरवर जोरदार ट्रेंड करत आहे. हा ट्रेंड पुढे नेत अनेक ट्विटर युजर्स या चित्रपटाबद्दल त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटात अक्षय कुमारला मुस्लिम व्यक्तीच्या रुपात दाखवण्यात आले आहे, ज्याचे नाव सज्जाद अली खान आहे. दुसरीकडे, सारा अली खान हिला हिंदू मुलीच्या रुपात दाखवण्यात आले आहे, तिचे नाव रिंकू रघुवंशी आहे. सारा अली खानलाही रिंकूच्या आईच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते, जी सज्जाद अली खानच्या प्रेमात होती.

हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप!

ट्विटरवर ‘अतरंगी रे’च्या विरोधात पोस्टचा महापूर आला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वजण करत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, ‘लव्ह जिहाद’ला हिंदी चित्रपटांमध्ये प्रोत्साहन दिले जात आहे. ‘लव्ह जिहाद’ थांबवायचा असेल तर सर्वप्रथम हिंदी चित्रपट निर्मितीला लगाम घालावा लागेल.’

एका वापरकर्त्याने त्याच्या ट्विटमध्ये काही बातम्यांचे कटिंग जोडले आहेत, ज्यामध्ये देशातील एका भागाला लक्ष्य करण्यात आले आहे. या वापरकर्त्याने लिहिले की, ‘बॉलिवूडने नेहमीच हिंदू धर्माला लक्ष्य केले आहे आणि अनेक प्रसंगी बदनाम केले आहे.’

इतकेच नाही तर अनेकांनी या ट्रेंडद्वारे अक्षय कुमारचा क्लासही घेतला आहे. अक्षय कुमार देशभक्ती आणि राष्ट्रहिताबद्दल बोलत असला तरी, तो स्वत: अशी भूमिका करत असल्याचे अनेक यूजर्सचे म्हणणे आहे.

आनंद एल राय दिग्दर्शित अतरंगी या चित्रपटावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटावर बहिष्कार टाकणाऱ्या वापरकर्त्यांचा दावा आहे की, चित्रपटात अनेक प्रसंगी हिंदूंचा अपमान करण्यात आला आहे आणि देव आणि धर्माविरोधात अश्लील भाषा वापरली गेली आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीसोबतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंच राजपूतचे समर्थकही पुढे आले आहेत. सुशांतसोबत वेगळा मुद्दा जोडून ते दिवंगत अभिनेत्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा :

Rajesh Khanna Birth Anniversary | अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यानंतर मुद्दाम तिच्या घरासमोरून वरात घेऊन गेले राजेश खन्ना! वाचा किस्सा…

Happy Birthday Twinkle Khanna | अक्षयसोबतचा साखरपुडा मोडताच डिप्रेशनमध्ये गेली, अखेर पैज हरल्यानंतर ट्विंकलने केले लग्न!