Shubman Gill : वर्ल्ड कपसाठी टीममधून डच्चू, आता शुबमनची 48 तासांत या संघात निवड, टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत खेळणार
Shubman Gill VHT 2025 : पीसीएने विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात टीम इंडियाच्या 3 स्टार आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांमध्ये अर्शदीप सिंह, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.

बीसीसीआय निवड समितीने आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप (Icc T20i World Cup 2025) राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कप निमित्ताने भारतीय संघात फिनिशर रिंकु सिंह याचं कमबॅक झालं. तसेच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याचा समावेश करण्यात आला. ईशानला संजू सॅमसन याचा बॅकअप विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली. तर उपकर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याला डच्चू देण्यात आला आहे. शुबमनला डच्चू देण्यात आल्याने चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शुबमनचा VHT स्पर्धेसाठी पंजाब संघात समावेश
शुबमन सातत्याने गेल्या काही सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरत होता. शुबमनला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यानंतरही शुबमनला वारंवार संधी देण्यात येत होती. मात्र त्यानंतरही शुबमनला काही खास करता आलं नाही. त्यामुळे अखेर शुबमनला बाहेर करावं लागलं. शुबमनला जरी वर्ल्ड कप संघात स्थान मिळालं नसलं तरी त्याचा विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे. शुबमन या स्पर्धेत टीम इंडियातील सहकाऱ्यांसह खेळताना दिसणार आहे.
शुबमन कुणासोबत खेळणार?
पीसीए अर्थात पंजाब क्रिकेट असोसिएशनने विजय हजारे ट्रॉफीसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शुबमन व्यतिरिक्त विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी पंजाब संघात टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंह आणि अभिषेक शर्मा या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. शुबमन, अर्शदीप आणि अभिषेक या तिघांव्यतिरिक्त इतर युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. मात्र या तिघांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
पंजाबचा पहिला सामना केव्हा?
पंजाब या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 24 डिसेंबरला महाराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. मात्र पीसीएने अद्याप पंजाबचा कर्णधार कोण असणार? हे जाहीर केलेलं नाही.
पंजाबसोबत ग्रुपमध्ये आणखी कोण कोण?
पंजाबसोबत ग्रुपमध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि मुंबईचा समावेश आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतीलची सांगता 8 जानेवारीला होणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाब क्रिकेट टीम : शुबमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), हरनूर पन्नू, अनमोलप्रीत सिंह, उदय सहारण, नमन धीर, सलिल अरोरा (विकेटकीपर), सनवीर सिंह, रमनदीप सिंह, जशनप्रीत सिंह, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, रघु शर्मा, कृष भगत, गौरव चौधरी आणि सुखदीप बाजवा.
