यूट्यूबर गणेश शिंदेंनी बायकोचं स्वप्न पूर्ण केलं, योगिता शिंदेंना घेऊन गेले ‘या’ विशेष ठिकाणी

गणेश शिंदे आणि योगिता शिंदे या जोडप्याने नुकतीच नवी गाडी घेतली आहे. त्यामुळे ते सध्या अनेक ठिकाणी फिरायला जात आहेत. या दरम्यान, गणेश यांच्या पत्नी योगिता यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे.

यूट्यूबर गणेश शिंदेंनी बायकोचं स्वप्न पूर्ण केलं, योगिता शिंदेंना घेऊन गेले 'या' विशेष ठिकाणी
गणेश शिंदे आणि योगिता शिंदे
आयेशा सय्यद

|

Mar 09, 2022 | 1:58 PM

मुंबई : गणेश शिंदे (Gansesh Shinde) आणि योगिता शिंदे (Yogita Shinde) हे जोडपं सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतं. या दोघांचे व्हीडिओ अनेकांना आवडतात. त्यांचा ग्रामिण अंदाज अनेकांना आवडतो. त्यांचं साधं राहाणं आणि ग्रामिण बोलणं अनेकांच्या पसंतीला उतरतं. या जोडप्याने नुकतीच नवी गाडी घेतली आहे. त्यामुळे ते सध्या अनेक ठिकाणी फिरायला जात आहेत. या दरम्यान, गणेश यांच्या पत्नी योगिता यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे. योगिता यांना नळदुर्गला फिरायला जायची इच्छा होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी ती बोलून दाखवली होती. अन् अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे.

योगिता यांची इच्छा पूर्ण

गणेश यांच्या पत्नी योगिता यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे. योगिता यांना नळदुर्गला फिरायला जायची इच्छा होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी ती बोलून दाखवली होती. अन् अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे. याचा व्हीडिओ त्यांनी शेअर केला आहे. “माझ्या बायकोची अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली”, असं गणेश म्हणत आहेत. तर “माझी लग्न झाल्यापासून इथं यायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली”, असं योगिता म्हणाल्या आहेत.

गणेश शिंदे आणि योगिता शिंदे या जोडप्याने तुळजापूरहून परत येताना नळदूर्ग किल्ल्याची सफर केली. इथे त्यांना शिवानीचे फॅनही भेटले तसा व्हीडिओ त्यांनी शेअर केला.

शिंदे कुटुंबाचा मराठवाडा दौरा

त्याचबरोबर शिंदे कुटुंब बीडला गेलं होतं. त्यांनी तिथे काही सोशल मीडिया कलाकरांची भेट घेतली. तसंच ते लातूरमध्येही गेले होते. तिथे त्यांनी ‘टिपिकल इंडियन गर्ल’च्या घरी भेट दिली.

कुस्तीपटू ते भाजपची स्टार प्रचारक ते थेट कंगनाच्या लॉकअपमध्ये, धाकड गर्ल बबिता फोगटचा प्रवास…

बॉयफ्रेंडसोबत लग्न त्याच्यावरच शोषणाचे आरोप, पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक, बोल्डनेसचं दुकान पूनम पांडेविषयी जाणून घ्या….

Lockupp Show : कंगना रनौतपेक्षा जास्त फॉलोव्हर्स असणारी ‘ इन्स्टाग्राम क्वीन’, कोण आहे अंजली अरोरा?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें