AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalaivii On Amazon Prime : कंगना रनौतचा ‘थलायवी’ ओटीटीवर प्रदर्शित, ‘जयललिता’ बनून प्रेक्षकांचे करतेय मनोरंजन!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने ‘थलायवी’मध्ये दमकदार अभिनय करून आपण कोणापेक्षा कमी नाही, हे सिद्ध केले आहे. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

Thalaivii On Amazon Prime : कंगना रनौतचा ‘थलायवी’ ओटीटीवर प्रदर्शित, ‘जयललिता’ बनून प्रेक्षकांचे करतेय मनोरंजन!
Thalaivii
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 2:06 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने ‘थलायवी’मध्ये दमकदार अभिनय करून आपण कोणापेक्षा कमी नाही, हे सिद्ध केले आहे. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट Amazon प्राईम व्हिडीओवर देखील प्रदर्शित झाला आहे.

कंगनाचा थलायवी चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट सणाच्या सुट्टीच्या निमित्ताने Amazon प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्राईमवर चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘थलायवी’ अॅमेझॉन प्राइमवर तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.

कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि अॅमेझॉन प्राईमवर चित्रपट रिलीज झाल्याची माहिती दिली. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

चित्रपटगृहांना केवळ 2 आठवड्यांसाठी अधिकार

कंगना रनौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन आठवड्यांनीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांना चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे अधिकार फक्त दोन आठवड्यांसाठी देण्यात आले होते, तर तामिळ आणि तेलुगू आवृत्त्यांना चार आठवड्यांचे अधिकार देण्यात आले होते.

बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात पडला कमी

‘थलायवी’ तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तिच्या अभिनेत्रीपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या प्रवासाबद्दल दाखवण्यात आला आहे. चित्रपट समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनाही तो आवडला आहे. थलायवीला कंगनाच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटले जात आहे. दक्षिणेत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे, पण उत्तर भारतात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.

थलायवी मधील कंगना सोबतच अरविंद स्वामी, भाग्यश्रीसह अनेक सेलेब्स महत्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. प्रत्येकाचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे.

जयललिता यांची कथा

या चित्रपटात जयललितांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या राजकीय संघर्षांपर्यंत चर्चा करण्यात आली. चित्रपटात कंगना रनौत व्यतिरिक्त अरविंद स्वामी आणि भाग्यश्री सारखे अनेक कलाकार सामील होते. अभिनेते अरविंद स्वामींनी या चित्रपटात एमजी रामचंद्रन यांची भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री भाग्यश्री जयललितांची आई संध्या यांच्या भूमिकेत दिसली होती.

कंगना रनौत साकारणार ‘सीता’

बॉलिवूडची ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या ‘थलायवी’ चित्रपटासाठी बरीच चर्चेत आहे. कंगनाला या चित्रपटात जयललिता यांचे पात्र साकारल्याबद्दल कौतुकाची थाप मिळत आहे. दरम्यान, कंगनाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. जयललितांच्या भूमिकेनंतर आता कंगना लवकरच ‘माता सीता’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आलोक देसाई यांचा हा चित्रपट अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली. याआधी अशी बातमी आली होती की करीना कपूर खान या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. पण करीनानं या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये फीची मागणी केली. त्यानंतर आता हे पात्र करीनाच्या हातून निसटलं आणि कंगना रनौतच्या हाती लागले आहे. या बातमीमुळे कंगना रनौतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा :

नुसरत जहाँने गुपचूप उरकले लग्न? यश दासगुप्तासाठी बर्थडे पोस्ट करत दिले संकेत…

‘अलबत्या गलबत्या’ फेम निर्माते राहुल भंडारे आणि अभिनेते वैभव मांगलेंचा सन्मान, पोस्टाच्या तिकिटावर मिळाले स्थान!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.