AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaj Udhas: पंकज उधास यांच्या पत्नीची पुण्यातील कोट्यवधींची प्रॉपर्टी चर्चेत; दर महिन्याला बँक देणार तब्बल इतकं भाडं

दिवंगत गझल गायक पंकज उधास यांच्या पत्नी फरीदा पंकज उधास यांनी नुकतीच एक प्रॉपर्टी डील केली असून त्याची चर्चा होत आहे. त्यांनी पुण्यातील आपली मालमत्ता एका बँकेला भाड्याने दिली आहे.

Pankaj Udhas: पंकज उधास यांच्या पत्नीची पुण्यातील कोट्यवधींची प्रॉपर्टी चर्चेत; दर महिन्याला बँक देणार तब्बल इतकं भाडं
गायक पंकज उधास आणि त्यांची पत्नीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 9:20 AM
Share

दिवंगत प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एक मोठी प्रॉपर्टी डील समोर आली आहे. पंकज उधास यांच्या पत्नी फरीदा पंकज उधास यांनी पुण्यातील आपली कमर्शियल प्रॉपर्टी ‘आयसीआयसीआय बँके’ला तब्बल 9 वर्षांसाठी लीजवर दिली आहे. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 2.89 कोटी रुपये असल्याची माहिती प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे समोर आली आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’कडून मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सनुसार, पुण्यातील हडपसर-मुंढवा रोड परिसरातील ‘फरेना कॉर्पोरेट पार्क’ इथं ही प्रॉपर्टी आहे.

नऊ वर्षांचा करार

पहिल्या मजल्यावरील तब्बल 3,347 स्क्वेअर फूट कमर्शियल स्पेस ICICI बँकेनं लीजवर घेतली आहे. या जागेसाठी बँक दर महिन्याला 2.50 लाख रुपये भाडं देणार आहे. म्हणजे सुरुवातीच्या दरानुसार वर्षाला सुमारे 30 लाख रुपयांचं भाडं होणार आहे. या प्रॉपर्टीचा लीज करार 17 सप्टेंबर 2026 रोजी रजिस्टर झाला असून त्याच दिवसापासून लीज सुरू झाली आहे. करारानुसार हा कालावधी 9 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दर तीन वर्षांनी भाड्यात 10 टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण लीज कालावधीत मिळणारे एकूण भाडे सुमारे 2.89 कोटी रुपये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या व्यवहारासाठी ICICI बँकेनं 10 लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट दिली आहे. शिवाय लीजवर दिलेल्या जागेसोबत पार्किंगची सुविधाही आहे. यात चार कार आणि 15 दुचाकींसाठी पार्किंग उपलब्ध असल्याची माहिती प्रॉपर्टी कागदपत्रांमध्ये आहे. करारामध्ये एकूण 105 दिवसांचा रेंट-फ्री कालावधी असून सहा महिन्यांचा लॉक-इन पीरियडदेखील आहे. विशेष म्हणजे ICICI बँकसाठी या कॉम्प्लेक्समधील ही पहिलीच जागा नाही. बँक याच ठिकाणी 2,794 स्क्वेअर फूट कमर्शियल युनिट आधीपासून लीजवर वापरत आहे. त्यामुळे या नव्या करारानंतर या कॉर्पोरेट पार्कमधील बँकेचा लीज्ड स्पेस आणखी वाढला आहे.

पुण्यातील हडपसर-मुंढवा परिसर हा कमर्शियल आणि रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचा भाग मानला जातो. रोजगार केंद्रे, निवासी प्रकल्प आणि शहरातील इतर भागांशी कनेक्टिव्हिटी यामुळे या परिसरात व्यावसायिक जागांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पंकज उधास यांच्या पत्नीच्या या प्रॉपर्टीचा व्यवहारही चर्चेत आला आहे.

Follow Us
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...