लवकरच पार्टीला निघालात…, शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती आणि पित्याच्या नात्यावर प्रश्नचिन्ह, फोटो व्हायरल

Shefali Jariwala Husband and Father: शेफाली जरीवाला हिच्या निधनानंतर वडील आणि पतीच्या नात्यावर अनेकांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह... सध्या सर्वत्र व्हायरल फोटोची चर्चा..., अनेकांनी कमेंट करत दिली प्रतिक्रिया

लवकरच पार्टीला निघालात..., शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती आणि पित्याच्या नात्यावर प्रश्नचिन्ह, फोटो व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Sep 08, 2025 | 2:02 PM

Shefali Jariwala Husband: झगमगत्या विश्वातील ‘कांटा लगा गर्ल’ म्हणजे अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. वयाच्या 42 व्या वर्षी वर्षा हिने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराचा झटका आल्यामुळे अभिनेत्रीचं निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनानंतर पती पराग त्यागी आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेफाली हिच्या निधनानंतर पराग कायम दिवंगत पत्नीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर पराग याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सांगायचं झालं तर, निधनानंतर पराग त्यागी याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये शेफालीचे वडील आणि पती यांच्यातील नातं कसं हे दिसून येतं. पण एका फोटोने चाहत्यांचं देखील लक्ष वेधलं आहे. शिफाली हिचे वडील पराग याच्या छातीला किस करताना दिसले. यामागे कारण देखील तसं आहे. पराग याने स्वतःच्या छातीवर शेफाली हिचा टॅटू काढला. त्याच टटूला शिफाली हिच्या वडिलांनी किस केलं.

 

 

परागने पोस्ट केला व्हिडीओ?

शेफाली जरिवाला हिच्या वडिलांचा वाढदिवस असल्यामुळे पराग याने पत्नीच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे फोटो देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आणि म्हणाला, शेफालीकडून बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा… माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे… सध्या पराग याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता पराग याच्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहोत. अनेकांनी पराग याचं कौतुक केलं. तर अनेकांनी पराग याच्यावर निशाणा साधला. एक नेटकरी म्हणाला, ‘तुझ्यासारखा नवरा देवाच्या कृपेने सर्वांना भेटला पाहिजे…’, दुसरी एक महिला म्हणाली, ‘तुला पाहिल्यानंतर असं वाटतं जगात प्रेम अजूनही आहे…’, तर एक नेटकरी पराग याला ट्रोल करत म्हणाला, ‘शेफालीच्या निधनानंतर इतक्या लवकर पार्टी देखील करु लागले…’ सध्या पराग याच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सांगायचं झालं तर, शेफाली जरिवाला आणि पराग त्यागी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल होतं. दोघांनी अनेक शोमध्ये एकत्र सहभाग नोंदवला… शेफाली रुपेरी पडद्यावर फार सक्रिय नव्हती. पण सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. निधनानंतर देखील शेफाली हिला चाहते विसरु शकलेले नाही… अभिनेत्री आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत…