लता मंगेशकरांच्या सेक्रेटरीसोबत पळून लग्न, पैशांसाठी मारहाण आणि…, खडतर होतं आशा भोसले यांचं वैवाहिक आयुष्य
Asha Bhosle: 'मला सासरी वाईट वागणूक दिली आणि जेव्हा...', लता मंगेशकरांच्या सेक्रेटरीसोबत आशा भोसले यांनी केलं पळून लग्न, सासारी वाईट आणि मारहाण..., खडतर होतं आशा भोसले यांचं वैवाहिक आयुष्य

Asha Bhosle: कुटुंबियांच्या पसंतीने असूदे किंवा मग लव्ह मॅरेज… लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील फार मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असतो… कारण लग्न म्हणजे फक्त दोन दिवसांचा सोहळा नसून लग्नानंतर मोठ्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेण्याची तयारी देखील ठेवावी लागते… अशात जोडीदार चांगला असेल तर, सर्वकाही सुरळीत आणि आनंदाने होतं. पण जोडीदार कशातच साथ देत नसेल तर एकट्यावर सर्व जबाबदाऱ्यांचं डोंगर पडतं… असंच काही प्रख्यात सिने पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासोबत देखील झालं आहे. सेलिब्रिटी आहेत म्हणजे त्यांचं आयुष्य फार चांगलं आणि रॉयल असेल असं आपल्याला वाटतं… पण असं काही नाही. सेलिब्रिटींना देखील खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो…
वयाच्या 16 वर्षी पळून केलं लग्न…
आशा भोसले यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी 31 वर्षीय गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केलं. 1949 मध्ये आशा भोसले आणि गणपतराव भोसले यांनी पळून लग्न केलं. गणपतराव भोसले हे दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. बहिणीने पळून लग्न केल्यामुळे लता मंगेशकर देखील फार दुःखी होत्या… ज्यामुळे लता मंगेशकर यांनी बहिणीसोबत असेले सर्व संबंध तोडले…
पण जेव्हा आशा भोसले पहिल्यांदा आई झाल्या, त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी त्यांची स्वीकार केला… पण ही गोष्ट गणपतराव भोसले यांना बिलकूल आवडली नव्हती… आशा भोसले यांनी मंगेशकर कुटुंबियांसोबत कोणतं नातं ठेवावं.. अशी गणपतराव भोसले यांची बिलकून इच्छा नव्हती.
अखेर गणपतराव भोसले यांना आशा भोसले यांना त्रास देण्यास सुरुवात केली. ते आशा भोसले यांच्याकडे पैसे मागू लागले आणि लता मंगेशकर यांना भेटण्यास देखील नकार दिला. अखेर दोघांमध्ये भांडणं देखील होऊ लागली… एवढंच नाही तर, गणपतराव भोसले यांनी आशा भोसले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
सासरच्या घरात मिळाली वाईट वागणूक
कविता छिब्बर यांना दिलेल्या एका मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या होत्या. ‘कमी वयात मी 20 वर्ष मोठ्या पुरुषासोबत लग्न केलं. माझं लव्ह मॅरिज होतं आणि लता दीदी यांना माझं लग्न मान्य नव्हतं… गणपतरावांचं कुटुंब खूप रूढीवादी होतं आणि ते एका गायिकेला सून म्हणून स्वीकारू शकत नव्हते.
‘मला सासरी वाईट वागणूक दिली आणि जेव्हा मी सर्वात लहान मुलहा आनंद याला जन्म देणार होती तेव्हा मला घरातून बाहेर काढलं… तेव्हा मी माझ्या आई – बहिणींकडे परतली… तरी देखील मी कधी कोणाला दोष दिला नाही. माझ्या मनात कोणासाठी वाईट भावना नव्हत्या…’ असं देखील आशा भोसले म्हणाल्या होत्या..
