AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti chopra साखरपुड्यात झाली भावुक; होणाऱ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू पाहून राघव चड्ढा यांनी…

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातीन Unseen फोटो तुफान व्हायरल; साखपुड्यात अभिनेत्रीच्या डोळ्यातील अश्रू पाहू शकले नाही खासदार राघव चड्ढा..

Parineeti chopra साखरपुड्यात झाली भावुक; होणाऱ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू पाहून राघव चड्ढा यांनी...
| Updated on: May 22, 2023 | 3:49 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. कतरिना कैफ, आलिया भट्ट, किआरा अडवाणी यांनी देखील मोठ्या थाटात लग्न केलं… बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला आहे. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या अभिनेत्रीच्या साखपुड्यातील अनसीन फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या साखपुड्याची चर्चा आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट झळकत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने, ‘आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात पाय ठेवत आहे… म्हणून प्रचंड उत्साही आहे..’ असं कॅप्शनमध्ये म्हणाली..

काही फोटोंमध्ये परिणीती भावुक झाली असून खासदार राघव चड्ढा होणाऱ्या पत्नाचे अश्रू पुसताना दिसत आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘आमची साखरपुड्याची पार्टी एखाद्या स्वप्नाप्रमाणे होती. आनंद, प्रेम, डान्स, भावना.. यांनी परिपूर्ण..’ शिवाय परिणीतीने राघव चढ्ढा यांना तिचा आधार, प्रेम आणि चांगला मित्र असं देखील सांगितलं आहे..

सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला. आता चाहते अभिनेत्रीच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

साखरपुडा होण्याआधी परिणीती चोप्रा – राघव चड्ढा यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही भूमिका स्पष्ट केलं नाही. मुंबई याठिकाणी हॉटेलबाहेर दोघांना स्पॉट केल्यानंतर नात्याच्या चर्चांनी जोर धरला..

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...