Parineeti Chopra | परिणीती चोप्राच्या हातावर लागली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी; खास फोटो व्हायरल

Parineeti Chopra | परिणीती चोप्रा लवकरच होणार परिणीती राघव चड्ढा... अभिनेत्रीच्या हातावर लागली होणाऱ्या पतीची मेहेंदी... लवकरच अडकणार विवाहबंधनात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा... खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Parineeti Chopra | परिणीती चोप्राच्या हातावर लागली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी; खास फोटो व्हायरल
| Updated on: Sep 20, 2023 | 12:26 PM

मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मुंबईमध्ये एका हॉटेल बाहेर दोघांना स्पॉट करण्यात आल्यानंतर राघव आणि परिणीती एकमेकांना डेट करत असल्याचं रहस्य सर्वांसमोर आलं. आता लवकरच राघव आणि परिणीती विवाहबंधनात अडकरणार आहेत. दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. मेहंदी आणि हळदी समारंभासाठी परिणीती 17 सप्टेंबर रोजी मुंबईहून दिल्लीत दाखल झाली होती. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे..

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा मेहंदी सोहळा 19 सप्टेंबरला झाल्याचे सांगण्यात येत आहे. राघव चढ्ढा यांच्या घरी हा सोहळा पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्न उदयपूर येथील द ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे. दोघांच्या लग्नासाठी पाहुणे लग्नठिकाणी पोहोचत आहेत… एववढंच नाही तर, परिणीती आणि राघव यांचं घर देखील नव्या नवरी प्रमाणे सजवण्यात आलं आहे.

 

 

सोशल मीडियावर सध्या परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे आणि सजवलेल्या घरांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिणीती आणि राघव यांचा मेहंदी सोहळा 19 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता सुरू झाला होता. कडेकोट बंदोबस्तात राघव चढ्ढा यांच्या घरी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील काही विधीनंतर उदयपूरला रवाना होतील. 24 सप्टेंबर रोजी दुपारी राघव चढ्ढा यांचा विवाह सोहळा पार पडेल. परिणिती आणि राघव चढ्ढा दुपारी 3.30 वाजता सप्तपदी घेतील. त्याच दिवशी 24 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता रिसेप्शन होणार आहे.

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा

परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला. तेव्हा अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात देखील अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता चाहते परिणीती आणि राघव यांना पती – पत्नीच्या नात्यात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.