ही प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडच्या मागे रस्त्यावर नग्न अवस्थेत धावत होती, तिचा मृत्यूही धक्कादायकच
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीने सर्व अभिनेत्रींपेक्षा जास्त स्टारडम पाहिले. जिने तिच्या सौंदर्याने सर्वांना जिंकले होते त्याच अभिनेत्रीसोबत असा काही किस्सा घडेल अशी कोणीही कल्पना केली नव्हती. ही अभिनेत्री एकदा रस्त्याने तिच्या बॉयफ्रेंडच्या मागे नग्न धावत होती. पण असं तिच्याबाबत काय घडलं होतं? आणि ती प्रसिद्ध अभिनेत्री कोण होती जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याबाबतीत काही घटना अशा घडलेल्या आहेत ज्यांचा विचार आपण करूही शकत नाही. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री जिच्यासोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असायची, ज्या अभिनेत्रीने सर्वांच्या मनावर तिच्या सौंदर्याने तथा तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. या अभिनेत्रीच्याबाबतीत अशी एक घटना घडली जी ऐकल्यानंतर खरंच खूप धक्का बसतो. ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडच्या मागे चक्क नग्न अवस्थेत रस्त्यावर धावत होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री कोण आणि तिच्याबाबतीत असं काय घडलं होतं जाणून घेऊयात.
लेडी सुपरस्टार म्हणून ओळखं
80 च्या दशकातील ही सुंदर अभिनेत्री जीने आश्चर्यकारक स्टारडम पाहिलं आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून परवीन बाबी. होय परवीन 80 च्या दशकातील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जात असते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नव्हते. त्यांचे नाव चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याशीही जोडले गेले होते. एका मीडिया मुलाखतीत महेश यांनी परवीनसोबतच्या त्यांच्या नात्याची पुष्टीही केली होती. तसेच या मुलाखतीदरम्यान त्यांनी अभिनेत्रीबद्दल एक धक्कादायक किस्सा सांगितला होता.
ती रस्त्यावर तशीच धावत आली. तिने कपडे घातले नव्हते.
ते म्हणाले “एकदा मी परवीनला प्रोत्साहित करत होतो आणि तिच्याशी बोलत होतो कारण तिला भीती वाटत होती की कोणीतरी तिला मारणार आहे. ती म्हणायची की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. मी तिची ही भीती घालवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी ती बाथरूममध्ये गेली, ते पाहून मी रागाने घराबाहेर पडलो. मग ती रस्त्यावर माझ्यामागे तशीच धावत आली. तिने कपडे घातले नव्हते. हे पाहून मला धक्का बसला. मी तिला कसेबसे लगेच घरात घेऊन गेलो.” अशाप्रकारे महेश भट्ट यांनी परवीन बाबी यांच्याबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. तसेच ते त्यांच्यावर इतकं प्रेम करत होते की त्यांनी परवीनसाठी आपले घर सोडले होते आणि ते तिच्यासोबत राहू लागले.
View this post on Instagram
मृत्यू गूढ पद्धतीने झाला
परवीन बाबीचा मृत्यू चित्रपटसृष्टीत एक गूढच आहे. असे म्हटले जाते की त्यांचा मृत्यू अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आणि उच्च मधुमेहामुळे झाला. तिचा मृतदेह अनेक दिवस घरात पडून होता आणि दुर्गंधी जाणवल्यानंतर त्यांच्या निधनाबद्दल समजलं. वृत्तानुसार, परवीन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा एक मानसिक आजार देखील होता, ज्यामुळे ती मानसिकरित्या अस्वस्थ झाली होती.
