
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावत हिने नुकताच एक फोटो शेअर केल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. कंगना राणावत हिचा हा फोटो पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. फक्त हे नव्हे तर लोक कंगना राणावत हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. कंगना राणावत हिने एक फोटो शेअर केलाय, त्या फोटोमध्ये सर्व पदार्थ हे नॉनव्हेजचे दिसत आहेत. यामुळेच मोठा गोंधळ उडाल्याचे बघायला मिळतंय. लोकांनी या फोटोचा स्क्रीन शाॅर्ट काढला असून तो तूफान व्हायरल होताना दिसतोय.
कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, सनातन धर्माचे पालन करते आणि मी आता मांसाहार सोडून दिला आहे. मात्र, आता कंगना राणावत हिने थेट नॉनव्हेज पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे कंगना राणावत हिने हे जेवण प्रोड्यूसरसाठी तयार केले आहे. कंगना राणावत ही या फोटोमुळे मोठ्या वादात सापडली आहे हे स्पष्ट दिसतंय.
एकाने लिहिले की, कंगना राणावत हिच्यासाठी सर्वकाही माफ आहे. दुसऱ्याने लिहिले की, हे लोक यांच्यानुसार धर्माचे पालन करतात. तिसऱ्याने लिहिले की, काही दिवसांपूर्वीच ही अयोध्येमध्ये केली होती, सर्वकाही नाटक आहे. अजून एकाने लिहिले की, काहीतरी विचित्रपणा आहे. लोक सतत कंगना राणावत हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मी हळूहळू पूर्ण मासांहार सोडला असून मी आता मासांहार करत नाही. आता हेच बोलणे कंगना राणावत हिच्या अंगलट आल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता या वादावर कंगना राणावत ही काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे स्पष्टपणे बघायला मिळते.
मुळात म्हणजे कंगना राणावत ही कायमच वादात अडकताना दिसते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत ही विषय कोणत्याही असो आपले म्हणणे मांडताना दिसते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर नेहमीच बाॅलिवूड कलाकार दिसतात. नेहमीच त्यांच्यावर कंगना राणावत ही टिका करते.