
मुंबई : उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मात्र, उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. तगडी अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर (Social media) उर्फी जावेद हिची बघायला मिळते. अगदी कमी कालावधीमध्ये उर्फी जावेद हिने एक खास ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद आणि वाद (Dispute) हे समीकरण बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये काही महिलांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोध मोर्चा काढला होता. महिला उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या.
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात अंदाजा हा लावला जाऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वीच चक्क झाडाच्या सालीपासून कपडे तयार करत ते उर्फी जावेद हिने घातले होते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत उर्फी जावेद हिने हे स्पष्ट केले की, हा ड्रेस तयार करण्यासाठी झाडाचे कोणत्याही पध्दतीने नुकसान करण्यात नाही आले.
नुकताच उर्फी जावेद ही अत्यंत अतरंगी स्टाईलमध्ये दिसली आहे. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिला पाहून पापाराझी हे देखील भीतीने पळायला लागले. उर्फी जावेद ही अत्यंत अतरंगी कपड्यांमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचे अजिबात अंग दिसत नाही. अंगच काय तर तिचे केस देखील दिसत नाहीये.
या नव्या आणि अतरंगी ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा चेहरा देखील दिसत नाही. फक्त श्वास घेण्यासाठी, डोळे दिसण्यासाठी आणि ओठांसाठी थोडी जागा सोडण्यात आली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सुरूवातीला तर उर्फी जावेद हिला पाहून लोक घाबरले होते. मात्र, आता या लूकसाठी उर्फी जावेद हिचा मजाक उडवला जात आहे.
एकाने उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर कमेंट कर म्हटले की, अरे हा तर चमत्कार झाला आहे. दुसऱ्याने लिहिले की, कोई मिल गयाच्या जादूमधून आलीये. तिसऱ्याने म्हटले की, एलियनच दिसत आहे. अजून एकाने म्हटले की, आता उर्फी जावेद सुधारल्याचे दिसत आहे. आता उर्फी जावेद हिच्या या लूकमधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.