AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phiri Phiri Nach: ‘फिरी फिरी नाच पोरी’ गाण्यावर तुफान रील्स, का होतोय इतका ट्रेंड? त्याचा नेमका अर्थ काय?

Phiri Phiri Nach: आज ‘फिरी फिरी नाच पोरी’वर बनणाऱ्या असंख्य रील्समुळे हे गाणं पुन्हा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. गाण्याचा साधा अर्थ, उत्साही ठेका आणि खानदेशी मातीचा सुगंध यामुळेच त्याचा सोशल मीडिया ट्रेंड आणखी वाढताना दिसतोय.

Phiri Phiri Nach: 'फिरी फिरी नाच पोरी' गाण्यावर तुफान रील्स, का होतोय इतका ट्रेंड? त्याचा नेमका अर्थ काय?
गाण्यावर सेलिब्रिटींचाही डान्सImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 3:24 PM
Share

Phiri Phiri Nach: सोशल मीडियावरील अकाऊंट उघडलं की सध्या एक गाणं वारंवार कानावर पडतंय, ते म्हणजे ‘फिरी फिरी नाच पोरी’! इन्स्टाग्राम रील्सपासून लग्नसमारंभांपर्यंत या अहिराणी गाण्याचा ठेका ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही या गाण्यावर रील्स करताना दिसत आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकरने, अभिनेता अजिंक्य राऊत यांनीही या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे. ‘फिरी फिरी नाच पोरी’ या गाण्याचा अर्थ काय, ते अचानक इतकं का ट्रेंड होतंय, याबद्दल जाणून घेऊयात..

‘फिरी फिरी नाच पोरी’ म्हणजे नेमकं काय?

‘फिरी फिरी नाच पोरी’ हे खानदेशातील लोकप्रिय अहिराणी गाणं आहे. अहिराणी ही जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागांत मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी बोली आहे. या भाषेतील गाण्यांमध्ये स्थानिक संस्कृती, ग्रामीण जीवन, प्रेम, विनोद आणि उत्सवांचा रंग पाहायला मिळतो. त्यामुळे अहिराणी गाण्यांचा ठेका केवळ खानदेशापुरता मर्यादित राहिलेला नाही.

‘फिरी फिरी नाच पोरी’ या शीर्षकाचा अर्थ साधारणपणे ‘पुन्हा पुन्हा नाच, मुली’ किंवा ‘मोकळेपणाने नाच’ असा होतो. गाण्याच्या बोलांमध्ये तरुणीच्या नृत्याचं आणि तिच्या उत्साही अंदाजाचं कौतुक करण्याचा लोकसंगीताचा बाज आहे. त्यामुळे त्याची चाल ऐकताच डान्स करण्याचा मोह होतो.

सेलिब्रिटींचाही गाण्यावर डान्स-

गाणं कोणी गायलं?

ऑनलाइन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या गाण्याशी बाबू मोरे यांचं नाव जोडलेलं आहे. गाण्याच्या विविध व्हर्जन्स आणि रीमिक्स सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या एका 2026 च्या व्हर्जनमध्ये मेघा मुसळे यांचा आवाज, प्रमोद मोरे यांचं गीत आणि विलास वाघ यांचं संगीत असल्याचं समजतंय. याशिवाय या गाण्याच्या फीमेल व्हर्जनपासून डीजे रिमिक्स आणि बँड परफॉर्मन्सपर्यंत अनेक व्हर्जन्स इंटरनेटवर पाहायला मिळत आहेत.

गाण्याचा ट्रेंड इतका का वाढला?

अहिराणी गाण्यांचा खास ग्रामीण ठेका, साधे शब्द आणि सहज करता येतील अशा डान्स स्टेप्स हे त्यांच्या लोकप्रियतेचं एक कारण मानलं जातं. ‘फिरी फिरी नाच पोरी’वर सध्या कपल्स, तरुण-तरुणी तसेच कलाकार रील्स करत आहेत. ‘फिरी फिरी नाच पोरी’ हे काही पहिलं अहिराणी गाणं नाही ज्याने सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली. ‘सावन ना महिना मा’, ‘केसावर फुगे’, ‘हाई झुमका वाली पोर’, ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ अशी अनेक गाणी याआधीही महाराष्ट्रात गाजली आहेत. अहिराणी संगीताची ही वाढती लोकप्रियता खानदेशी संस्कृती आणि स्थानिक बोलीला सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या नव्या व्यासपीठाचं उदाहरण आहे.

Follow Us
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...