AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पितृपक्षापूर्वीच शुटर्सनी मुंबईत… टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, थेट..

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर एकच मोठी खळबळ उडाली. टायगर श्रॉफ या हल्ल्यात जखमी झाला. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे.

पितृपक्षापूर्वीच शुटर्सनी मुंबईत... टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, थेट..
Tiger Shroff
| Updated on: Oct 19, 2026 | 9:56 AM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे. टायगर श्रॉफ याच्या गोळीबारावर झालेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली. भर रस्त्यावर अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी गाडीत चारजण होते. अभिनेता टायगर श्रॉफ जखमी असल्याची माहिती मिळतंय. ही घटना घडवण्यासाठी पल्सर बाईकचा वापर करण्यात आला होता. ही पल्सर बाईक काल रात्री अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळून जप्त करण्यात आली. रात्री ही बाईक डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. या बाईकच्या मालकालाही बोलावण्यात आले आहे. पल्सर बाईकचा पहिला मालक जोगेश्वरी भागातील आहे. त्याने ती दुसऱ्या कोणालातरी विकली आणि दुसऱ्या मालकाने ती तिसऱ्या मालकाला विकली. गोळीबार करणाऱ्यांनी तिसऱ्या मालकाकडून बाईक खरेदी केली, परंतु कागदपत्रांचे हस्तांतरण केले नाही.

बाईकच्या मालकाची चौकशी सुरू आहे. पितृपक्षापूर्वी शूटरनी तिसऱ्या मालकाकडून बाईक घेतली होती. बाईकची कागदपत्रे हस्तांतरित झाली नव्हती. नवरात्रीनंतर कागदपत्रांच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली.तिसऱ्या मालकाला पैसे मिळाले होते. टायगर श्रॉफ याच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबारासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तूल वापरल्याचा संशय आहे.

फॉरेन्सिक विभागाच्या प्राथमिक तपासणीत गावठी पिस्तुल म्हणजेच (कॉपी पीस) मधून फायरिंग केल्याचा संशय. हल्लेखोरांनी एकूण सात ते आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्याचे टार्गेट चुकले.. पाचवी गोळी झाडल्यानंतर दुसऱ्या शूटरने टायगर श्रॉफवर जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जाम झाल्याने चालवू शकला नाही असा अंदाज.

गोळीबारापूर्वी आरोपींनी परिसराची रेकी केली होती, पुष्पा पार्कजवळ सुमारे 45 मिनिटे थांबल्याची सूत्रांची माहिती. घटनेनंतर दोन्ही हल्लेखोर तिसऱ्या साथीदाराने तयार ठेवलेल्या मोटारसायकलवरून फरार झाले. अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पोलीस चौकीच्या परिसरात मोटारसायकल सोडून आरोपी पसार झाले.ते नक्की कुठे गेले, याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपी मुंबईबाहेर सुरतच्या दिशेने फरार झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

Follow Us
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?