AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपर डुपर.. वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज; ‘सालबर्डी’तल्या रहस्यमयी घटनांचा लावणार छडा

शांत, निरागस वाटणाऱ्या गावात अचानक काही अशा घटना घडू लागतात, ज्यामुळे भीतीचं सावट पसरतं. या रहस्यमयी कथेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पोलीस अधिकारीची भूमिका साकारणार आहे. तिचा लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

सुपर डुपर.. वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज; 'सालबर्डी'तल्या रहस्यमयी घटनांचा लावणार छडा
Pooja SawantImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 9:11 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी. आय. मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच ‘सालबर्डी’ या चित्रपटाचा दमदार टीझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचं बारकाईने निरीक्षण केलं. या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, “वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.” चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अ‍ॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’ चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचं आहे. पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचं संगीत लाभलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशिष पाटील यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...