AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूनम पांडे आहे जिवंत, का पसरवली निधनाची अफवा? व्हिडीओतून सत्य समोर

Poonam Pandey : का पूनम पांडे हिचे पसरवली स्वतःच्या निधनाची अफवा? जाणून व्हाल हैराण, अभिनेत्रीच्या व्हिडीओतून सत्य समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूनम पांडे हिच्या व्हिडीओची चर्चा...

पूनम पांडे आहे जिवंत, का पसरवली निधनाची अफवा? व्हिडीओतून सत्य समोर
| Updated on: Feb 03, 2024 | 1:10 PM
Share

Poonam Pandey : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या निधनाच्या चर्चांमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्रीचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण आता अभिनेत्री जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूनम पांडे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला पूनम पांडे हिने माफी मागितली… पूनम म्हणाली, ‘माझ्या मृत्यूच्या निधनानंतर अचानक सर्वाइकल कॅन्सरची चर्चा होऊ लागली. सर्वाइकल कॅन्सर अधिक बोललं जावं हाच माझा उद्देश होता. ज्यावर काहीही बोललं जात नाही. पण आता सर्वत्र सर्वाइकल कॅन्सरची चर्चा होत आहे. सर्वाइकल कॅन्सर कधी आपले प्राण घेईल सांगताही येत नाही आणि या रोगाला स्पॉटलाईची गरज आहे… जर कोणाला याबद्दल अधिक प्रश्न विचारायचे असतील तर, आपण hauterrfly वर भेटू…’ असं पूनम व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

पूनम पांडे हिच्या निधनाच्या चर्चांनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. पण अभिनेत्री जिवंत आहे. लोकांमध्ये सर्वाइकल कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने मोठं पाऊल उचललं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2024-2025 चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्वाइकल कॅन्सरबद्दल मोठी घोषणा केली. सरकार सर्वाइकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींना निशुल्क लसीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला.

सर्वाइकल कॅन्सरचा धोका महिलांना अधिक असतो. स्तनाच्या कर्करोगानंतर हा दुसरा सर्वात जास्त प्रभावित होणारा कर्करोग आहे. सुरुवातील सर्वाइकल कॅन्सरची लक्षणं दिसून येत नाहीत. याच कारणामुळे अनेक वर्षांनंतर देखील सर्वाइकल कॅन्सरचं निदान होत नाही. भारतात, विशेषत: स्त्रियांमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर सर्वाइकल कॅन्सरचं निदान होतं. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि बहुतांश महिलांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या सर्वत्र पूनम पांडे हिने सर्वाइकल कॅन्सरसाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...