AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांना भेटताच पूनम पांडेच्या डोळ्यात पाणी, वृंदावनमधील Video व्हायरल

Poonam Pandey : होळीपूर्वी पूनम पांडे वृंदावनमध्ये कृष्णभक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. तिथे तिने प्रेमानंद महाराजांचे आशीर्वादही घेतले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेमानंद महाराजांना भेटताच पूनम पांडेच्या डोळ्यात पाणी, वृंदावनमधील Video व्हायरल
Poonam PandeyImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 24, 2026 | 9:59 PM
Share

बॉलिवूडमधील मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी ती आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवते, तर कधी क्रिकेटपटूंवर कमेंट करून ट्रोल होते. मात्र आता तिचे एक वेगळेच रूप तिच्या चाहत्यांना पहायला मिळाले आहे. होळीपूर्वी पूनम पांडे वृंदावनमध्ये कृष्णभक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. तिथे तिने प्रेमानंद महाराजांचे आशीर्वादही घेतले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पूनम पांडेच्या डोळ्यात पाणी

पूनम पांडे नेहनी तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. सध्या ती धार्मिक यात्रेसाठी वृंदावनला पोहोचली. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये पूनम प्रेमानंद महाराजांचे सत्संग ऐकताना दिसत आहे. यावेळी ती इतकी भावनिक झाल्याचे दिसत आहे की तिला चक्क रडू कोसळले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पूनम पांडेच्या डोळ्यात आलेले पाणी ती अध्यात्माशी किती जोडलेली आहे याची पावती देतात. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर तिने बांके बिहारींना भेट दिली. मंदिरात पाय ठेवताच ती पुन्हा भावनिक झाली. ती बांके बिहारींच्या मंदिरात हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. तिचा व्हिडिओ पाहून असे वाटत आहे ती खूप काळापासून चिंतेत होती, मात्र वृंदावनला पोहोचल्यानंतर तिचे मन हलके झाले. या शहरात ती ई-रिक्षातून प्रवास करताना दिसली. पूनम पांडेच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या धार्मिक भेटीमुळे तिच्या मनाला शांती मिळाल्याचे दिसत आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

वृंदावनमध्ये पूनम पांडेला सलवार-सूटमध्ये पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने लिहिले की, ‘पूनम सलवार-सूटमध्ये आणि मेकअपशिवाय किती सुंदर दिसते.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली.’ आणखी एकाने लिहिले की, ‘भक्ती अशीच असते; ती सर्वांना बदलते.’ आणखी एकाने लिहिले की, ‘सध्या, आपण भक्तीच्या काळात आहोत.” दुसऱ्या एकाने म्हटले की, ‘जर ती खरोखर भक्तीच्या मार्गावर असेल, तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.’

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक