AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली ’15 दिवसांत..’

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या कथानकात दररोज वेगवेगळे ट्विस्ट पहायला मिळत आहेत. अशातच या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणाली '15 दिवसांत..'
तेजश्री प्रधान, सुबोध भावेImage Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2026 | 11:38 AM
Share

झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे हा समरची आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वानंदीची भूमिका साकारतेय. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय. या मालिकेच्या कथानकात काही दिवसांपूर्वीच मोठा ट्विस्ट आला होता. समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाली होती. आता अवघ्या पंधरा दिवसांतच या अभिनेत्रीची मालिकेतून एक्झिट झाली आहे. सोशल मीडियावर या अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मालिकेत एकीकडे समर आणि स्वानंदी एकमेकांच्या जवळ येत आहेत. अशातच मल्लिका त्यांच्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा सतत प्रयत्न करतेय. समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात दुरावा यावा यासाठी समरची जुनी मैत्रीण त्यांच्या घरी राहायला येणार असल्याचं मल्लिका स्वानंदीला सांगते. मैत्रीण किमया घरी येणार असल्याचं कळताच समरलाही खूप आनंद होतो. मालिकेत किमयाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री पूर्वा गोखलेची एण्ट्री झाली होती. परंतु अवघ्या 15 दिवसांत ती ही मालिका सोडून जात आहे.

अभिनेत्रीची पोस्ट-

सेटवरील कलाकारांसोबत मजामस्ती करतानाचे, निरोप समारंभाचे फोटो पूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘किमया.. ती वादळासारखी आली आणि शांतपणे विसावली. यावेळी सर्वांनीच वादळाचा आणि त्याच्या गोंधळाचा आनंद घेतला. 15 दिवसांच्या तिच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेनं माझ्यावर खूप प्रेम, आदर, आपुलकी आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. आभारी आणि कृतज्ञ. माझ्या प्रिय सहकलाकारांनो.. ज्यांच्यामुळे मला सेटवर घरासारखं वाटलं. तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल.’

पूर्वाच्या या फोटोंवर कमेंट करत सुबोध भावेनं लिहिलं, ’18 तास’ आणि हार्टचे इमोजी पोस्ट केले. तर ‘मलाही तुझी आठवण येते’, असं तेजश्री म्हणाली. नेटकऱ्यांनीही पूर्वाच्या भूमिकेचं कौतुक केलं. ‘किमयाच्या भूमिकेतील तुझं काम खरोखरच सुंदर आणि अविस्मरणीय होतं. तू ज्याप्रकारे प्रत्येक भावना साकारली, त्यामुळे ते पात्र खूप वास्तविक आणि खास वाटलं. ही भूमिका आमच्या आठवणींमध्ये कायम राहील आणि तुझा शेवटचा सीन तर अप्रतिमच होता,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....