AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death: दादा माझ्याबद्दल जे दोन शब्द बोलेले ते…, असं काय म्हणाली गौतमी पाटील?

Ajit Pawar Death: नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नृत्यांगना गौतमी पाटील हिने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार निधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar Death: दादा माझ्याबद्दल जे दोन शब्द बोलेले ते..., असं काय म्हणाली गौतमी पाटील?
गौतमी पाटील
| Updated on: Feb 05, 2026 | 9:40 AM
Share

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. 28 जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. विमान अपघातात दादा यांचं निधन झालं. मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचा विमान अपघातातन निधन झालं. अजित दादा यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर, आता नृत्यांगना गौतमी पाटील हिने अजित पवार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत गौतमी पाटील हिला, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आपल्यात नाहीये, ते म्हणजे अजित दादा.’ यावर गौतमी पाटील म्हणाली, ‘माझ्या आईने मला याबद्दल सांगितलं… बातमी पाहिली तेव्हा मला मोठा धक्का बसला… माझा यावर विश्वासत बसत नाहीये… दादांच्या बाबतीत असं काही होईल असं कधीच वाटलं नव्हतं… मी दादांना कधीच भेटले नाही, पण त्यांनी कायम मला पाठींबा दिला. ते माझ्यासाठी जे काही बोलायचे, तेच माझ्यासाठी खूप होतं… दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. पण त्यांच्यासोबत जे काही झालं, ते खूप चुकीचं झालं आहे.

पुढे गौतमी म्हणाली, ‘मला अद्यापही फार मोठा धक्का बसला आहे. त्यातून मी सावरलेली नाही. त्यांनी कायम कलाकारांना पाठिंबा दिला. त्यांच्याकडे कोणतं काम केलं घेऊन गेलं, तर ते काम 100 टक्के पूर्ण होणारच… असा प्रत्येकाचा विश्वास होता… आम्ही कधी भेटलो नाही. पण दादा माझ्याबद्दल दोन शब्द बोलले आणि तेथेच त्यांनी माझं मन जिंकलं… मला नाही वाटत महाराष्ट्र कधी त्यांना विसरु शकेल… दादा अख्ख्या महाराष्ट्राचे ते लाडके नेते होते आणि कायम असतील.’ असं देखील गौतमी पाटील म्हणाली.

अजित पवार यांचं निधन…

बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात दादा यांचं अकस्मित निधन झालं. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह, खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडेंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को – पायलट शांभवी पाठक होत्या. या सर्वांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य अद्यापही मोठ्या धक्क्यातून सावरलेलं नाही.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला