AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी एकाच चित्रपटात, प्रभास म्हणतो ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करीत असल्याने प्रभास यांना प्रचंड आनंद झाला आहे, कारण प्रभासचं स्वप्न होतं की, बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं त्यामुळे त्याचं हे स्वप्न पुर्ण झाल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे.

प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी एकाच चित्रपटात, प्रभास म्हणतो ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे'
प्रभास-अमिताभ बच्चन
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 20, 2022 | 8:20 AM
Share

मुंबई – प्रभास-अमिताभ बच्चन (prabhas – amitabh bachchan) यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे, कारण दोघेही आता एका नव्या चित्रपटात (new movie) दिसणार असल्याचे दोघांनी ट्विट (Tweet) करत सांगितले आहे. कारण अभिताभ बच्चन यांनी मागील अनेक चित्रपटात प्रभास यांची भूमिका पाहिल्यानंतर प्रभास एक प्रतिभावान कलाकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच प्रभास याने मला बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळतंय म्हणजे माझं स्वप्न पुर्ण होण्यासारखं आहे. आत्तापर्यंत दोघांनीही एकमेकांची तारिफ केल्याची पाहिली आहे, त्यामुळे दोघांचा एक वेगळा चित्रपट पाहायला मिळणार आहे. प्रभासने बाहुबली चित्रपटात उत्तम भूमिका केल्याने तो देशातील अनेकांच्या घरात पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ देखील झाली होती.

नाग अश्विन यांचं दिग्दर्शन 

अमिताभ बच्चन हे आपल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करीत असतात, तसेच त्याचे चाहते देखील त्यांना शुभेच्छा आणि कमेंट करून प्रश्न विचारत असतात. त्यामुळं चाहत्यांमध्ये आणि बच्चन यांच्यात एक वेगळं नात असल्याचं पाहायला मिळतं. प्रभाससोबत पहिला सीन झाल्यानंतर तात्काळ अमिताभ बच्चन यांनी ट्विट करीत ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अभिताभ बच्चन यांनी प्रभास एक चांगला कलाकार असून मला त्यांच्याकडून या चित्रपटात अधिक काही शिकायला मिळेल असं वाटतंय असं ट्विट केलं आहे. नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण या दोघांच्या जोडीमुळे तुम्हाला येणा-या काळात नवीन काहीतरी पाहायला मिळणार यात काही शंका नाही.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभासला आनंद

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करीत असल्याने प्रभास यांना प्रचंड आनंद झाला आहे, कारण प्रभासचं स्वप्न होतं की, बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं त्यामुळे त्याचं हे स्वप्न पुर्ण झाल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं आहे. अजून ते काम करीत असलेल्या चित्रपटाचं नाव ठरलेलं नसून त्याला प्रोजेक्ट के असं म्हणटलं जात आहे. तसेच या दोघांच्या जोडीला सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन देखील मुख्य भूमिकेत असणार असल्याची माहिती मिळत आहे. तिघेही अनुभवी कलाकार असल्याने त्यांच्या चांगल्या अभिनयातून प्रेक्षकांना चांगला चित्रपट पाहायला मिळेल. दुपिका पदुकोनचा सध्या आलेल्या गेहराईयाँ या चित्रपटात तिने चांगला अभिनय केल्याने ती चाहत्यांमध्ये अधिकभर पडली आहे. तसेच तिचं कौतुक देखील करण्यात येत आहे. बच्चन यांच्या झुंडची सुध्दा सोशल मीडियावर चर्चा आहे.

अभिनेत्री जिया खानचा मृत्यू, सूरज पांचोलीला अटक, 9 वर्षे जुनी बॉलिवूडची भळभळती जखम

चहा विकून आयुष्य जगत होते अन्नू कपूर, चांगल्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला दिलं वळणं

“तुला ही लढाई जिंकावीच लागेल”, गंगूबाई काठियावाडीचा नवा ट्रेलर रिलीज

Follow Us
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार