चहा विकून आयुष्य जगत होते अन्नू कपूर, चांगल्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला दिलं वळणं

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 20, 2022 | 6:00 AM

अन्नु कपूर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या भूमिका सुध्दा त्यांच्या चाहत्यांच्या अधिक लक्षात आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते ज्यावेळी रेडिओवरती एखादी गोष्ट किंवा कहाणी सांगत असतात त्यावेळी अनेकांचे कान त्यांच्या बोलण्याकडे टवकारलेले असतात.

चहा विकून आयुष्य जगत होते अन्नू कपूर, चांगल्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला दिलं वळणं

मुंबई – अन्नू कपूर (Annu Kapoor) यांचा आवाज कानावर पडला तरी अनेकजण लगेच म्हणतात की, हा अन्नू कपूरचा आवाज आहे. कारण त्यांच्या जादुई आवाजाचे अनेक चाहते भारतात आहेत. ते बोलत असताना अनेकजण शांत ऐकत बसतात. कारण प्रत्येकवेळी ते काहीतरी लोकांना नवीन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना उत्तम सादरकर्ता असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी केलेले सादरीकरण लोक आजही आठवून सांगतात. त्यांनी त्यांची करिअरमध्ये (career) खूप संघर्ष केलाय. कारण त्यांच्या घरची परिस्थिती ज्यावेळी हालाकीची होती. त्यावेळी त्यांना शाळा सोडून चहा विकला. जशी त्यांच्या घरची परिस्थीती बदलली त्यावेळी त्यांनी त्यांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण (education)घेतलं. संघर्ष कोणाला चुकलेला नाही. तसेच संघर्ष केल्याशिवाय कोणी मोठा होऊ शकत नाही असं अन्नु कपूर म्हणतात. त्यांना रेडिओच्या माध्यमातून ऐकत असताना तुम्हाला एखादा चित्र न दिसता ते तुमच्या डोळ्यासमोर उभं करतात याला उत्तम सादरकर्ता म्हणतात.

रेडिओवरती बोलत असताना अनेकांचे कान त्यांच्याकडे असतात

अन्नु कपूर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या भूमिका सुध्दा त्यांच्या चाहत्यांच्या अधिक लक्षात आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते ज्यावेळी रेडिओवरती एखादी गोष्ट किंवा कहाणी सांगत असतात त्यावेळी अनेकांचे कान त्यांच्या बोलण्याकडे टवकारलेले असतात. कारण 80 च्या दशकातील स्टोरी सांगाव्या त्यांनी आणि ऐकाव्या तुम्ही असं सुत्र आहे. कोरोनाच्या काळात लोकांना मदत करून फोटो काढणा-या लोकांना त्यांनी स्पष्टशब्दात फटकारलं होतं. ते म्हणाले, दोन रोटी देणार आणि तब्बल २० फोटो काढणार…

पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड

अन्नु मलिक यांनी त्यांच्या मंडी चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती. हा चित्रपट 1983 ला प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळखायला लागले कारण त्यांची बॉलीवूडमध्ये चित्रपट यायच्या आगोदर अजिबात ओळख नव्हती. तसेच त्यांना पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांच्या वडिल एका पंजाबी घरातून आहेत, तर त्यांची आई एका बंगाली घरातून आहे. अन्नु मलिक यांनी दोन लग्न केली आहेत. एक परदेशी पत्नी आहे, तर एक भारतीय पत्नी आहे. अन्नु कपूर यांनी त्यांची स्वत:ची ओळख केली आहे. माझा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नाही.

पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार, आणखी राज्यात किती प्रकल्प आणि निधीची व्यवस्था काय?

Hijab : हिजाब घालून मतदान करायला आलेल्या महिलेला भाजप कार्यकर्त्यानं रोखलं, तामिळनाडूतील प्रकार

Jhund Song: लफडा झाला वाकडा तिकडा, नागराजच्या झूंडचं दुसरं गाणं रिलिज, झिंगाटपेक्षा भारी?


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI