CJP ला प्रकाश राज – शाबाना आझमी यांचा भक्कम पाठिंबा, म्हणाले, ‘आज रात्री आम्ही…’

कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. आज जतंर - मंतर येथून मोर्चा निघणार आहे. ज्यासाठी जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. याव्यतिरिक्त, सोमवारी होणाऱ्या 'चलो संसद' कार्यक्रमासाठीही मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती अपेक्षित आहे.

CJP ला प्रकाश राज - शाबाना आझमी यांचा भक्कम पाठिंबा, म्हणाले, आज रात्री आम्ही...
CJP
| Updated on: Jul 20, 2026 | 9:08 AM

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार म्हणजे आजपासून रोजी सुरू होत असून 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. तर, दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. 20 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोक जंतर – मंतर येथे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. एवढंच नाही तर, लोकांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी देखील सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन करण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती उपोषण स्थळी पोहोचले. अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते प्रकाश राज यांसारखे दिग्गजांनी कॉकरोच जनता पार्टीला सनर्थन दिले. रविवारी दोघे उपोषण स्थळी होती. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

एवढंच नाही तर, अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला राजकारणाबद्दल काहीही माहिती नाही. पण हे विद्यार्थ्यांसाठी आहे. राजकारण किंवा कोणत्या धर्मासाठी नाही…’, असं म्हणत पूनम हिने सोनम वांगचुक याचं देखील समर्थन दिलं. तर प्रकाश यांनी देखील कॉकरोच जनता पार्टीला मोठी पाठिंबा देत लक्षवेधी वक्तव्य केलं.

तर शबाना आझमी यांनी देखील आंदोलनाला बसणाऱ्यांचं प्रेमाने अभिवादन केलं. सीजेपीकडून शबाना यांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश राज देखील अभिवादन करताना दिसत आहेत. प्रकाश राज यांनी मुलांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि त्यांचं समर्थन केलं. तर शबाना आझमी यांनी मंचावरुन सोनम वांगचुक यांचं देखील समर्थन केलं.

प्रकाश राज म्हणाली – आज रात्री तुमच्यासोबत आहे…

प्रकाश राज दुसऱ्यांदा जंतर मंतर येथे पोहोचले आणि भाषण दिलं. प्रकाश राज म्हणाले, ‘आज रात्री मी तुमच्या सोबत आहे… मी येथेच आहे. पाहतो काय होतं ते…’, शिवाय एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, ‘आपल्या देशातील तरुण आता प्रश्न विचारत आहे. हे तरुण एकाच उद्देशाने एकत्र आले आहेत आणि लढत आहोत… ‘, तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे देखील जंतरमंतरवर पोहोचले.

CJP चं 6 जूनपासून जंतरमंतरवर आंदोलन

CJP द्वारे आयोजित हे आंदोलन सुरूच असून, ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, सोनम वांगचुक 28 जूनपासून उपोषणावर आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, दिल्ली पोलिसांनी शनिवारी सोनम वांगचुक यांना तेथून नेले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us