जुळ्या भावांची अनोखी लव्हस्टोरी, ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’!

ड्रामा, इमोशन आणि विनोदाने परिपूर्ण अशी जुळ्या भावंडांची गोष्ट येत्या 27 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. 

Premacha game same to same, जुळ्या भावांची अनोखी लव्हस्टोरी, ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’!

 मुंबई : जगात एकसारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्ती असतातच. आपल्या चेहऱ्याशी साम्य असणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेतरी असेल ही कल्पनाच कसली भारी आहे. जरा विचार करा अचानक एखाद्या दिवशी तुमच्यासारखी हुबेहुब दिसणारी व्यक्ती तुम्हाला भेटली आणि ती व्यक्ती तुमचं जुळं भावंड असल्याचं कळलं तर? गोंधळ उडेलना? असाच काहीसा गोंधळ उडणार आहे दिघा आणि अरविंदच्या आयुष्यात. (Premacha game same to same)

खरंतर हे दोघं जुळे भाऊ, दिसायलाही एकसारखे. मात्र वेगळ्या कुटुंबात वाढल्यामुळे दोघांचे स्वभाव परस्परविरोधी आहेत. विभिन्न स्वभावाचे दिघा आणि अरविंद एकमेकांना भेटल्यानंतर नेमकी काय गंमत घडेल याची मजेशीर गोष्ट ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

दिघा आणि अरविंद दोघंही दिसायला सेम टू सेम असल्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीतही बराच गोंधळ उडणार आहे. त्यामुळे ड्रामा, इमोशन आणि विनोदाने परिपूर्ण अशी ही मालिका प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल.

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम ही मालिका म्हणजे अक्शन, इमोशन, कॉमेडी आणि ड्रामा याने परिपूर्ण असा मनोरंजनाचा गुलदस्ता आहे. टेलिव्हिजनवर अलिकडच्या काळात अश्या प्रकारची दुहेरी भूमिका पाहायला मिळालेली नाही. विशेषत नायकाने साकारलेला डबलरोल पहाणं हा एक वेगळा अनुभव असेल.

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेची निर्मिती केली आहे  स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने. कोल्हापूरमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरु असून संचित चौधरी आणि सायली जाधव या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.  ड्रामा, इमोशन आणि विनोदाने परिपूर्ण अशी जुळ्या भावंडांची गोष्ट येत्या 27 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. (Premacha game same to same)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *