AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Christmas Spirit | प्रियंकाचे जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन, जॅकेटची किंमत ऐकून व्हाल हैराण!

अभिनेत्री  प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) हे सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जाते.

Christmas Spirit | प्रियंकाचे जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन, जॅकेटची किंमत ऐकून व्हाल हैराण!
| Updated on: Dec 25, 2020 | 6:22 PM
Share

मुंबई : अभिनेत्री  प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) हे सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जाते. हे दोघेही सध्या लंडनमध्ये एकत्र ख्रिसमस साजरी करत आहेत. याचा एक फोटो प्रियंकाने सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यात प्रियंका, निकसोबत दिसत आहेत. या फोटोत प्रियांकाने एक सुंदर ऑफ व्हाईट जॅकेट घातले आहे हे जॅकेट मैकेज या ब्रॅडचे आहे आणि तब्बल या जॅकेट किमंत 69,886 रुपये (950 डॉलर्स) म्हणजेच जवळपास 70 हजार रुपये आहे. (Priyanka and Nick are celebrating Christmas in London)

प्रियंकाचा चित्रपट ‘द व्हाइट टाइगर’ रिलीज होण्याच्या तयारीत आहे. आता सध्या प्रियंका तिच्या आगामी चित्रपट ‘टेक्सस फ्रॉम यू इन लंदन’ चे शूटिंग करत आहे. देशामध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरूच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. यावरूनच सोशल मीडियावर प्रियंकाला जोरदार ट्रोल करण्यात आले होते.

प्रियंका चोप्रा न्यूयॉर्कमध्ये राहते आहे आणि तिथे बसून भारतातील आंदोलनावर तिने बोलू नये आणि तिला येथील शेतकऱ्यांचे दुःख काय माहिती आहे, असे ट्रोलर्सचे म्हणणे होते. प्रियंका चोप्राने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. यामधून काहीतरी मार्ग काढावा. या तिने केलेल्या ट्विटवरूनच तिला ट्रोल केले जात होते. अनुपम खेर यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात एक मोठ धक्कादायक विधान केले होते. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत. मात्र, कधी कधी हे शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते. आंदोलनामध्ये सरकारच्या निषेधार्थ दाखवण्यात आलेले खलिस्तानी झेंडे ही एक चिंतेची गोष्ट आहे.

संबंधित बातम्या :

Amitabh Bachchan | महानायकावर कविता चोरल्याचा आरोप, कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता!

Big Heart | ‘रेस 3चं’ अपयश विसरून सलमान रेमोच्या मदतीला, पत्नीने मानले आभार!

(Priyanka and Nick are celebrating Christmas in London)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....