AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra ने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा निक होता ७ वर्षांचा; अभिनेत्रीच्या सासूने सांगितले ‘ते’ क्षण

'नशीब आहे... आणि जे व्हायचं ते होतच...', प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा जोनस कुटुंबात कसं होतं वातावरण? निक होता फक्त सात वर्षांचा, यावर प्रियांकाच्या सासू म्हणतात...

Priyanka Chopra ने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा निक होता ७ वर्षांचा; अभिनेत्रीच्या सासूने सांगितले 'ते' क्षण
| Updated on: May 12, 2023 | 1:06 PM
Share

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ सीरिजमुळे चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्रीच्या सीरिजची तुफान चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीची सीरिज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाचे अभिनेत्रीने आभार मानले आहेत. सध्या अभिनेत्रीची मुलाखत सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. जेव्हा प्रियांका हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा अभिनेत्रीचा पती निक जोनस फक्त सात वर्षांचा होता. एवढंच नाही तर तेव्हा जोनस कुटुंबातील वातावरण कसं होतं यावर देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

प्रियांका आणि निक यांच्या वयामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, जेव्हा प्रियांका हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकलातेव्हा निक फक्त सात वर्षांचा होता. सध्या अभिनेत्री आगामी सिनेमा ‘लव्ह अगेन’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने सांगितलं जेव्हा २००० साली तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

प्रियांका हिच्या सासूने पहिल्यांदा अभिनेत्रीला टीव्हीवर पाहिलं होतं, तेव्हा निक सात वर्षांचा होता आणि त्याची भावंड आठ – नऊ वर्षांची होती. जेव्हा प्रियांका हिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा अभिनेत्री फक्त १८ वर्षांची होती.. हा कार्यक्रम लंडन याठिकाणी पार पडला होता. प्रियांका म्हणाली, ‘नशीब आहे… आणि जे व्हायचं तेच होतं…’

सासूच्या वक्तव्याच्या मान राखत अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझ्या सासऱ्यांना असे शो पाहायला फार आवडतात. ते शो पाहत होते आणि त्याठिकाणी निक आला. तेव्हा दोघांनी मला मिस वर्ल्डचा किताब जिंकताना एकत्र पाहिलं होतं. हे सर्व व्हायचं होतं आणि आयुष्यात अशा गोष्टी आठवणींसाठी होत असतात…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी २०१८ साली खिश्चन आणि हिंदू पद्धतीत लग्न केलं. दोघांच्या लग्ना चार वर्ष झाली आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. निक आणि प्रियांका यांच्या मुलीचं नाव मालती मेरी असं आहे. प्रियांका कामय मुलीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रियांका आणि निक यांनी सरोगसीच्या माध्यमातून मुलीचं जगात स्वागत केलं.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप