Laxmikant Berde: अरे बाबा तो माझा भाऊ नाहीये…अखरे वैतागून पुरुषोत्तम बेर्डे ‘लक्ष्या’बद्दल काय म्हणाले?
Purushottam Berde On Laxmikant Berde: पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे हे भावंड नसून कोण आहेत याबद्दल प्रथमच बोलून दाखवले आहे.

Laxmikant Berde Brother: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले असे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. ‘लक्ष्या’ या नावाने ते घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. या अभिनेत्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने ठसा उमटवलाय. मात्र, वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि सर्वांनाच धक्का बसला. आता लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातील नात्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
पुरुषोत्तम बेर्डे एका मुलाखतीत म्हणाले की,” राज कपूर आणि अनिल कपूर यांच्यात जसे नाते आहे तसेच आमच्यात आहे. आम्ही काही भाऊ नाहीत. पण आम्ही सख्खे भावडांपेक्षाही जास्त आहोत. सख्ख्या भावांमध्ये जेवढे घट्ट नाते होते तेवढेच आमच्यात होते. त्याचे कारण म्हणजे आम्हाला दोघांनाही एकमेंकाविषयी प्रचंड आदर होता. त्याला माझ्या क्रिएटिव्हीवर आकर्षण होते तर मला त्याचे लक्ष्मीकांत असण्याबद्दल आकर्षण होते, तो एक जातीवंत कलाकारा होता, आम्ही समाजात इतकं काम केलंय की सगळ्यांना वाटणं सहाजिक आहे की आम्ही भाऊ आहोत. पण मी अनेक वेळा सांगितले आहे की आम्ही भावंड नाहीत.”
“लक्ष्याच्या घरी मला मुलासारखे वागवायचे, तर माझ्या घरी तो आपलासा झाला होता. त्यामुळे घरातल्या लोकांचे नाते ही सख्या लोकांपेक्षा जास्त होते. आम्ही फक्त आडनावबंधू आहोत. पण आम्ही अनेकवेळा सांगूनही लोकांनी ऐकलं नाही, मग आम्ही ठरवलं की आपण सांगायचेच नाही. कोणी विचारलं तुम्ही भाऊ का हो भाऊ म्हणून आम्ही विषय संपवायचो. नंतर जेव्हा तो सुपरस्टार झाला तेव्हा माझी पंचायत अशी व्हायची की माझी अशी ओळख राहिली नव्हती, मी स्वत: एक दिग्दर्शक, लेखक असूनही अरे हे लक्ष्याचे भाऊ म्हणून मला ओळखायचे, पण कालांतराने मी या गोष्टी स्विकारल्या. नको असतं त्याचा भाऊ म्हणून मिरवणं तेव्हाही ऐकून घ्यावे लागते. ही ओळख एखाद्याला खटकू शकते ना, पण ठीक आहे आता.” असं पुरुषोत्तम बेर्डे यांनी बोलून दाखवले.
