AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajinikanth Health | रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार?

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना रविवारी म्हणजेच 27 डिसेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Rajinikanth Health | रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार?
| Updated on: Dec 27, 2020 | 6:50 PM
Share

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना रविवारी म्हणजेच 27 डिसेंबरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब उच्च होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रजनीकांत यांची प्रकृती सुधारत आहे आणि त्याचा बीपीही नियंत्रणात आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज आला आहे. मात्र, रजनीकांत यांची अजूनही काळजी घेतली जात आहे. (Rajinikanth discharged from hospital)

रजनीकांत ‘अन्नाथे’ (Annaatthe) चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेल्या 12 दिवसांपासून हैदराबादमध्ये आहेत. 25 डिसेंबर रोजी अचानक त्याची तब्येत बिघडली होती त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, रजनीकांत यांची तब्येत बरी आहे, म्हणूनच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. ते म्हणाले की, सध्या रजनीकांत यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.

रजनीकांत यांच्या चाचण्या करण्यात आल्या त्या सर्व नॉर्मल आल्या आहेत. त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. रजनीकांत यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत हे सध्या अन्नाथे या चित्रपटाचे शूटिंग करत होते. जिथे चित्रपटाच्या सेटवर 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

ज्यानंतर चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले होते. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. ज्यानंतर सेटवर कोरोना पॉझिटिव्ह रूग्न सापडल्यानंतर शूटिंग थांबविण्यात आले आहे. शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही त्यांच्यासोबत हैदराबादला आली होता. प्रोडक्शन हाऊसने ऐश्वर्या आणि वडील रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता.

संबंधित बातम्या : 

रजनीकांत निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार!

Rajinikanth Health Update | ‘थलायवा’च्या प्रकृतीत काहीशी सुधारणा, लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता!

(Rajinikanth discharged from hospital)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...