AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलियाने गुड न्यूज देताच राखी सावंतने अनोख्या अंदाजात साजरा केला जल्लोष

भांडी वाजवत, गाणी गात राखी सावंतने रणबीर-आलियाला दिल्या शुभेच्छा; Video व्हायरल

आलियाने गुड न्यूज देताच राखी सावंतने अनोख्या अंदाजात साजरा केला जल्लोष
राखी सावंतकडून भन्नाट अंदाजात शुभेच्छाImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 06, 2022 | 7:31 PM
Share

मुंबई- अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे आई-बाबा झाले आहेत. आज (6 नोव्हेंबर) आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. ही गुड न्यूज मिळताच सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही आलिया-रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच ड्रामा क्वीन राखी सावंत कशी मागे राहणार? राखीनेही तिच्या अनोख्या अंदाजात रणबीर-आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रविवारी सकाळी आलियाला मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या काही तासांतच तिने मुलीला जन्म दिल्याची गोड बातमी कळाली. आलियानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली.

राखी सावंतनेही जल्लोष साजरा केला. पापाराझींसोबत बोलताना तिने ताट आणि चमचा वाजवत गाण गायलं. इतकंच नव्हे तर तिचा बॉयफ्रेंड आदिलनेही पापाराझींमध्ये मिठाई वाटत रणबीर-आलियाला शुभेच्छा दिल्या.

“घरात लक्ष्मी आली, आलियाला मुलगी झाली. ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, अखेर तो दिवस उजाडला आहे. आलियाने गोंडस परीला जन्म दिला आहे. नीतू जी आणि संपूर्ण कपूर कुटुंबीयांना शुभेच्छा”, अशा शब्दांत राखीने आनंद व्यक्त केला.

या वर्षी एप्रिल महिन्यात रणबीर-आलियाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर जून महिन्यात आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. गरोदरपणात आलियाने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवरच रणबीर-आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास पाच-सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

Follow Us
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”