AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंतच्या मदतीला सलमान धावला, संकट शमलं, पण राखीला आता आई होता येणार नाही

सलमान खान याने आपल्या हॉस्पिटलचे बिलं भरल्याचं राखीने मुलाखतीत सांगितलं. सलमान आपल्याला काय लेव्हलला जावून मदत करतो, याबद्दल राखीने सांगितलं. दरम्यान, आजारी असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं या विषयी तिने माहिती दिली.

राखी सावंतच्या मदतीला सलमान धावला, संकट शमलं, पण राखीला आता आई होता येणार नाही
राखी सावंतच्या मदतीला सलमान धावला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 07, 2024 | 9:38 PM
Share

ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरं गेली आहे. राखी सावंत सध्या दुबईत आहे. राखीवर नुकतंच सर्जरी करण्यात आली आहे. राखीच्या पोटातून 10 सेमीचा ट्यूमर काढ्यात आला आहे. तिला या कठीण काळात बॉलिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान याने अतिशय मोलाची मदत केली आहे. सलमान खान याने राखीचे मेडिकल बिलं भरली आहेत. त्यामुळे राखीने सलमानचे खूप आभार मानले आहेत. राखी सावंत हिने स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत राखीने यूट्यूबर अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मिक हिच्यावरही निशाणा साधला आहे.

सलमान खान याने आपल्या हॉस्पिटलचे बिलं भरल्याचं राखीने मुलाखतीत सांगितलं. सलमान आपल्याला काय लेव्हलला जावून मदत करतो, याबद्दल राखीने सांगितलं. दरम्यान, आजारी असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं या विषयी तिने माहिती दिली. या कठीण काळात सलमान खानने आपल्याला खंबीर साथ दिली, असं राखी म्हणाली. आपण न बोलवता सलमान खान मदतीसाठी पुढे आला आणि त्याने मोठ्या रकमेचे मेडिकल बिलं भरली, असं राखीने सांगितलं.

राखी सलमानबद्दल काय म्हणाली?

“सलमान खान आपल्या लोकांना कधीच विसरत नाहीत. ते कुणालाही न सांगता मदत करतात. त्यांनी मला मेडिकल बिल्स भरण्यातही मदत केली. माझा एक्स पती रितेश हा देखील माझ्यासोबत धैर्याने उभा राहिला. आम्ही आता विभक्त झालो आहोत, असं असताना रितेशने मला साथ दिली”, असं राखी सावंत म्हणाली.

राखी आई बनू शकणार नाही?

राखीने यावेळी दु:ख व्यक्त केलं की, ती आता पुन्हा आई बनू शकणार नाही. “आतमध्ये वेदना खूप आहेत. पण या आयुष्याचा सामना करावाच लागेल. मी आता सरोगसीबद्दल विचार करेन. कारण मी मुलगा दत्तक घेऊ शकत नाही. मी विक्की डोनर सारखा प्लॅन करेन किंवा तसा विचार करेन. कारण कुणी वंशज हवं की नको?”, असं राखी सावंत म्हणाली.

राखी आदिल खान दर्रानीवर संतापली

यावेळी राखी सावंत हिने तिचा एक्स-पती आदिल खान दुर्रानी याच्याबद्दलही राग व्यक्त केला. “त्याने माझा फोन हॅक केला. स्वत:चे न्यूड व्हिडीओ लीक केले आणि माझ्याविरोधात केस टाकली. आता तो माझ्यावर ब्लेम करत आहे. मी निर्दोष आहे. त्याने मला बरबाद केलं. माझे सर्व पैसे घेऊन गेला. त्याने मला बदनाम केलं आहे”, असा आरोप राखी सावंत हिने केला.

राखीचा पायल मलिकवरही निशाणा

राखी सावंत यावेळी आरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकवरही संतापली. “चांगल्याची दुनियाच नाही. मी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होती कारण तिच्या बेस्ट फ्रेंडनेच तिच्या पतीसोबत लग्न केलं. त्यामुळे मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता. पण पायल माझंच नाव पब्लिसीटीसाठी वापरु लागली. अशा महिला देशाचं नाव खराब करत आहेत”, अशी टीका राखी सावंतने केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...