Ranbir Kapoor : ‘भारताने 5 हजार वर्षांपूर्वीच..’, एलॉन मस्कच्या ‘फ्लाइंग कार’वर रणबीरचा टोला, Video चर्चेत
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, रणबीर याने एलॉन मस्कच्या 'फ्लाइंग कार'वर टोला लगावला आहे. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमा पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे आणि सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमावर आहे. तर सिनेमाच्या प्रमोशनसाठी कास्ट पूर्ण मेहनत घेत आहे. दरम्यान, रणबीर कपूर, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग , यश आणि दिग्दर्शक नितेश तिवारी एका मुलाखतीत सहभागी झालेले. मुलाखतीत, त्यांनी सिनेमाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. मुलाखतीत होस्टने त्या काळातील शस्त्रास्त्रांचं कौतुक करताना म्हटलं की, ते आधुनिक शोधांनाही टक्कर देऊ शकतात. त्यांनी अकादमी पुरस्कार विजेते स्टुडिओ DNEG द्वारे करण्यात आलेल्या VFX चं देखली कौतुक केलं.
यावर दिग्दर्शक नितेश म्हणाले, त्या गोष्टींना पडद्यावर पुन्हा जिवंत करणं हा एक खूपच अप्रतिम अनुभव होता. यावर रणबीर म्हणाला, ‘अलिकडेच एलॉन मस्कने एक उडणारी कार बनवली आहे. मला वाटतं भारताने तर हे 5 हजार वर्षांपूर्वीच केलं होतं!’ यावेळी रणबीर कपूर ‘पुष्पक विमाना’बद्दल बोलताना दिसला.
पुष्पक विमानाची एलॉन मस्कच्या कारशी तुलना
रणबीरने पुष्पक विमानाबद्दल भाष्य केलं. पुष्पक विमान हा एक पौराणिक, स्वतः चालणारा हवाई रथ किंवा उडणारा महाल आहे, ज्याचे वर्णन हिंदू महाकाव्य ‘रामायण’ मध्ये आढळतं. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या गोष्टींपैकी ही एक अशी गोष्ट होती जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ही एक विशाल उडणारी रचना म्हणून दिसून आली.
पुष्पक विमान म्हणजे काय?
हिंदू पौराणिक कथेनुसार, दिव्य वास्तुकार विश्वकर्मा यांनी भगवान ब्रह्म्यासाठी एक विमान बनवलं होतं, जे ब्रह्म्याने संपत्तीचे देवता आणि रावणचा सावत्र भाऊ कुबेर यांना दिलं होतं. तथापि, रावणने कुबेरचा पराभव करून त्यांच्याकडून हे विमान हिरावून घेतलं. महाकाव्यामध्ये पुष्पक विमानाचं वर्णन एका अशा उडणाऱ्या महालाच्या रूपात केलं गेलं आहे, जो विचारांच्या गतीने चालतो आणि ज्यामध्ये कितीही प्रवाशांना बसवण्यासाठी त्याचा आकार वाढवता येतो.
‘रामायण’ सिनेमाची कास्ट आणि रिलीज
‘रामायण’ सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिका आहेत, तर साई पल्लवी सीताच्या भूमिकेत आणि यश रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत आहेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या रोलमध्ये दिसतील. सिनेमाचा पहिला भाग दिवाळीच्या मुहुर्तावर, 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.