AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर-आलियाची लेक राहाची ग्रँड बर्थडे पार्टी; कपूर कुटुंबासह इतर सेलिब्रिटींचीही हजेरी, किती वर्षांची झाली राहा?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा कपूरचा वाढदिवस नुकताच पार पडला. तिच्या वाढदिवसानिमित्त रणबीर-आलियाने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. कपूर कुटुंबासह राणी मुखर्जीसारख्या सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. नीतू कपूरने नातीच्या बर्थडे पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात पेप्पा पिग थीम आणि तसेच सेलिब्रेशनची झलक दिसून येत आहे.

रणबीर-आलियाची लेक राहाची ग्रँड बर्थडे पार्टी; कपूर कुटुंबासह इतर सेलिब्रिटींचीही हजेरी, किती वर्षांची झाली राहा?
alia bhatt and ranbir kapoor celebrate daughter raha 3rd birthdayImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 08, 2025 | 4:25 PM
Share

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा आता त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आणि चर्चेत असते. पापाराझी देखील तिचे फोटो घेण्यासाठी नेहमीच गर्दी करत असतात. राहा प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड आहे. तिची सध्याची प्रसिद्धी पाहता ती कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

राहाचा कितवा वाढदिवस?

राहा कपूरचा 6 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. राहा आता तीन वर्षांची झाली आहे. आलिया आणि रणबीरने त्यांच्या लेकीचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला आहे. या जोडप्याने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते.

राहाच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला तिची मावशी शाहीनपासून ते राणी मुखर्जीपर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच राहाची आजी, ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी या भव्य पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरून त्यांनी किती ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते हे लक्षात येते.

नीतू कपूरने राहाच्या वाढदिवसाचा फोटो  अन् व्हिडीओ शेअर केला आहे

नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राहा कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आतील काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये नीतू कपूर तिच्या कुटुंबासह आणि अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राहाची आजी, आजी आणि काकू शाहीन भट्ट एकत्र पोज देताना दिसत आहेत. फोटोमध्ये कपूर कुटुंबातील काही जवळच्या मैत्रिणी देखील दिसत आहेत. राहाच्या पार्टीतील हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पेप्पा पिगचा वाढदिवसाच्या पार्टीतील शो 

या फोटोंव्यतिरिक्त, राहाच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यात काही मुले लोकप्रिय कार्टून पेपा पिगचा आनंद घेताना दिसत आहेत.त्यावरून हे स्पष्ट होते की राहाच्या पार्टीचा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आनंद घेतला.

चाहत्यांनी राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच सिक्रेट असतात विशेषत: त्यांच्या मुलीच्याबाबतीत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोशल मीडियावर राहाबद्दलच्या अपडेट्स क्वचितच मिळतात. नीतू कपूर अनेकदा सोशल मीडियावर राहाबद्दलच्या पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियावर देखील आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लेकीला नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Follow Us
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...