AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | तब्बल 17 वर्षांनी प्रदर्शित झाला रणबीर कपूरचा पहिला चित्रपट, ऑस्करमध्येही मिळाले होते नामांकन!

बॉलिवूड ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. या अभिनेत्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

Ranbir Kapoor | तब्बल 17 वर्षांनी प्रदर्शित झाला रणबीर कपूरचा पहिला चित्रपट, ऑस्करमध्येही मिळाले होते नामांकन!
रणबीर कपूर
| Edited By: | Updated on: May 08, 2021 | 7:46 AM
Share

मुंबई : बॉलिवूड ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. या अभिनेत्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आपल्या कुटुंबाप्रमाणेच रणबीरने देखील मनोरंजन विश्वाचा मार्ग धरल. रणबीरने 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ (Saawariya) चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. या चित्रपटाच्या आधी देखील रणबीरने एका चित्रपटात काम केले होते (Ranbir Kapoor Acted in Short film Karma before entering in Bollywood).

सध्या रणबीर कपूर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नसला, तरी तो केवळ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अशा परिस्थितीत ‘सांवरिया’ हा रणबीरचा पहिला चित्रपट नव्हता, हे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल.

मग रणबीरचा पहिला चित्रपट कोणता?

जर ‘सांवरिया’ हा रणबीरचा पहिला चित्रपट नव्हता, तर मग त्याने नेमक्या कोणत्या चित्रपटात आधी काम केले होते? रणबीरने बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगोदर ऑस्कर नामांकित चित्रपटात काम केले होते. ‘सांवरिया’ पूर्वी रणबीर कपूरने ‘कर्मा’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले होते. 2004साली रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता बी.आर.चोप्रा यांचे नातू अभय चोप्रा यांनी दिग्दर्शन केले होते.

हा तेव्हाचा काळ होता, जेव्हा रणबीर कपूर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. चित्रपटाला स्टुडंट ऑस्करसाठीही नामांकन देण्यात आले होते. रणबीरची ही शॉर्ट फिल्म केवळ 2 मिनिटांची होती, यात रणबीर कपूर व्यतिरिक्त शरद सक्सेना, मिलिंद जोशी, सुशोवन बॅनर्जी सारख्या कलाकारांनी अभिनय केला होता (Ranbir Kapoor Acted in Short film Karma before entering in Bollywood).

अशी होती चित्रपटाची कहाणी

अभय चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये वडील आणि मुलगा यांच्यातील नाते संबंधांची मांडणी केली आहे. जेव्हा एखाद्या मुलाला मृत्यूदंड ठोठावला जातो, तेव्हा त्याच्या वडिलांना किती त्रास होतो, हे या लघुपटात दाखवण्यात आले होते. हा चित्रपट अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आला होता. त्यावेळी काही करणांमुळे हा लघुपट प्रदर्शित झाला नव्हता. पण आता बर्‍याच वर्षांनंतर हा चित्रपट ‘वांद्रे फिल्म फेस्टिव्हल’  या यूट्यूब वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.

पाहा हा लघुपट

‘ब्राह्मस्त्र’मध्ये झळकणार!

बऱ्याच दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. चाहते लवकरच त्याला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पाहू शकणार आहेत. या चित्रपटात तो पहिल्यांदाच गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि आलिया एकमेकांच्या जवळ आले होते. आता दोघांनीही त्यांचे प्रेम उघडपणे मान्य केले आहे. इतकेच नाही तर लवकरच हे जोडपे लग्नही करणार आहेत. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते आहे.

(Ranbir Kapoor Acted in Short film Karma before entering in Bollywood)

हेही वाचा :

शिल्पा शेट्टीच्या घरात कोरोनाचा विस्फोट, चिमुकल्या समिशासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण

‘पंगा क्वीन’वर आणखी एक नवं संकट, टीएमसीच्या प्रवक्त्याने कंगना रनौत विरोधात दाखल केली तक्रार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.