AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Animal | रणबीरकडून न्यू इयर गिफ्टची घोषणा, अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सिनेमात

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) कबीर सिंह चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांच्यासोबत काम करणार आहेत.

Animal | रणबीरकडून न्यू इयर गिफ्टची घोषणा, अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सिनेमात
| Updated on: Jan 01, 2021 | 12:02 PM
Share

मुंबई : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) कबीर सिंह चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांच्यासोबत काम करणार आहेत. या नवीन चित्रपटाचे नाव अ‍ॅनिमल असे आहे. अनिल कपूर यांनी चित्रपटाची घोषणा करत एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाशी संबंधित माहिती दिली जात आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये रणबीरचा आवाज येतो आहे आणि तो म्हणत आहे की, पापा पुढच्या आयुष्यात तुम्हाला माझा मुलगा व्हायचं आहे, मग मी तुमच्यावर प्रेम कसे करतो हे पाहा. मग तुम्ही हे शिका कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मीच तुमचा मुलगा आणि तुम्हीच माझे वडील असाल (Ranbir Kapoor and Anil Kapoor together for the first time in a big movie)

जेंव्हा रणबीर हे बोलत आहे तेव्हा मागून शिट्टया वाजत आहेत. आणि व्हिडिओमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूरशिवाय बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

हा व्हिडिओ शेअर करताना अनिल कपूर यांनी लिहिले आहे की,  ‘ओह बॉय! नवीन वर्ष या शिट्ट्यासारखा अधिक चांगले जावे. संदीप रेड्डी यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांच्या कबीर सिंह चित्रपटाचे मोठे कौतुक झाले होते. या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता.

रणबीर याशिवाय ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचवेळी अलीकडे अनिल कपूर एके वर्सेज एके मध्ये दिसला होता. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

Television : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मालिका महत्त्वाच्या टप्यात, उलगडणार उन्मेष अश्वाची गोष्ट

Rashmika Mandanna | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच वधारले रश्मिकाचे मानधन, ‘बिग बीं’सोबत काम करण्यासाठी आकारली ‘इतकी’ रक्कम!

(Ranbir Kapoor and Anil Kapoor together for the first time in a big movie)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.