AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor: अखेर अंत सच्चाई का होता है…चुकीचं बोलणं रणबीर कपूरला महागात पडलं, आता अभिनेत्याला थेट…

Ranbir Kapoor Ramayan Movie Promotion: रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट रामायण लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या पूर्वी रणबीर कपूरला सर्वांची माफी मागावी लागली.

Ranbir Kapoor: अखेर अंत सच्चाई का होता है...चुकीचं बोलणं रणबीर कपूरला महागात पडलं, आता अभिनेत्याला थेट...
| Updated on: Oct 22, 2026 | 7:31 AM
Share

Ranbir Kapoor Ramayan Movie: रणबीर कपूर  ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दसऱ्यानिमित्त कोलकात्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी रणबीर कपूरकडून भाषणात एक मोठी चूक झाली.

चेन्नईतील कार्यक्रमात रणबीर म्हणाला, “दसऱ्याच्या कार्यक्रमात बोलताना माझ्याकडून चूक झाली. मला असे म्हणायचे होते की, वाईट कितीही शक्तिशाली असले तरी, शेवटी चांगुलपणा आणि सत्याचाच विजय होतो. ही ओळ मला ‘रॉकस्टार’मधील ए. आर. रहमान सरांसोबतच्या माझ्या कामाची आठवण करून देते, जिथे मी म्हणालो होतो, ‘जो भी मैं कहना चाहूं बर्बाद करदे अल्फाज मेरे..’ त्यामुळे, मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो.”

कोलकात्यातील दसऱ्याच्या कार्यक्रमात रणबीर म्हणाला, “दसरा साजरा करण्यासाठी कोलकात्यात येणे हा एक मोठा आनंद आणि सौभाग्य आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. दसरा आपल्याला आठवण करून देतो की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी, शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच अंत होतोच, म्हणून, प्रेम पसरवा, आनंद वाटा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. रामायण टीमच्या वतीने, मी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्री राम.”

या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. नमित मल्होत्रा ​​​​निर्माते आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारवरील ‘पे-पर-व्ह्यू’ फीचरद्वारे चित्रपट खरेदी करून पाहण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल. पहिला भाग ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होईल. पुढच्या वर्षी, ‘रामायण २’ प्रभासच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटाशी टक्कर देणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंग आणि विवेक ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकांनी अॅडव्हान्स बुकिंग केल्यामुळे कोट्यवधी रुपये कमवले आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?