Randhir Kapoor : रणधीर कपूर ‘या’ गंभीर आजाराचा करतायत सामना, लेक करीना कपूरचा मोठा खुलासा; म्हणाली…

Kareena Kapoor On Randhir Kapoor : रणधीर कपूर एका गंभीर आजाराचा सामना करत असून त्याबद्दल करीना कपूरनं सांगितलं आहे.

Randhir Kapoor : रणधीर कपूर या गंभीर आजाराचा करतायत सामना, लेक करीना कपूरचा मोठा खुलासा; म्हणाली...
| Updated on: Oct 26, 2026 | 3:51 PM

बॉलिवूडमधील कपूर कुटुंब कायमच चर्चेत असतं. रणधीर कपूर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची मुलगी आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खाननं अलीकडेच वडिलांच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती दिली. रणधीर कपूर यांची स्मरणशक्ती काहीशी कमकुवत झाली असून, त्यांना डिमेन्शियाचा त्रास असल्याचं करीनानं सांगितलं.

‘वडिलांची स्मरणशक्ती थोडी कमी झाली आहे’

Loading...

करीना कपूर खान नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिनं आपल्या कुटुंबाविषयी काही गोष्टी सांगितल्या. तिचे वडील रणधीर कपूर यांचं वय आता जवळपास ८० वर्षांच्या आसपास असून, वाढत्या वयामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे, असं तिनं सांगितलं. करीना म्हणाली की, अलीकडेच तिचे आई-वडील तिच्या घरी आले होते. तिचे वडील अनेकदा जुने चित्रपट पाहत वेळ घालवतात. त्यांची स्मरणशक्ती काहीशी कमी झाली असून, त्यांना डिमेन्शियाचा त्रास आहे, अशी माहिती तिन दिली.

 

रणधीर कपूर यांना आनंद झाला

आपली मुलगी करीना कपूर एका लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं कळल्यावर रणधीर कपूर यांना आनंद झाला होता. करीनाने कार्यक्रमाविषयी सांगितल्यानंतर त्यांनी तो नक्की पाहणार असल्याचंही म्हटलं. वडिलांच्या या प्रतिक्रियेबद्दल सांगताना करीना भावूक झाली.

काय आहे डिमेन्शिया?

डिमेन्शिया म्हणजे केवळ विसरभोळेपणा नसून, मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारी स्थिती आहे. या समस्येमुळे व्यक्तीला अलीकडे घडलेल्या घटना लक्षात ठेवणं, संभाषण आठवणं किंवा दैनंदिन कामं करणं कठीण होऊ शकतं. मात्र, प्रत्येक व्यक्तीमध्ये या समस्येची लक्षणं आणि त्यांची तीव्रता वेगवेगळी असू शकते. वाढत्या वयात स्मरणशक्तीशी संबंधित काही बदल होऊ शकतात. परंतु वारंवार गोष्टी विसरणं, एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं किंवा परिचित ठिकाणीही गोंधळून जाणं अशी लक्षणं दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us