Viral Video : हे तर फार मोठं पाप, बायकोचे हात बांधून नवरा खायला लागला पाणीपुरी, नेटकऱ्यांचा भन्नाट कमेंट्स; व्हिडीओ पाहाच!
नवऱ्याने बायकोचे हात बांधून तिच्यासमोर पाणीपुरी खाल्ली, अन् तिचे हावभाव पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना. या मजेशीर व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

नवरा बायकोचं नातं म्हणजे कधी लहान मुलांसारखं प्रेमाने एकमेकांची काळजी घेणं. तर कधी कट्टर दुश्मन असल्यासारखी भांडणं करणं.त्यात एकमेकांना चिडवणं, एकमेकांची टिंगल उडवणं हे चालूच असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवऱ्याने आपल्या बायकोचे हात पाय बांधले तिला दाखवत तिला चिडवत पाणी पुरी खातो आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कुरकुरीत पुरी, त्यातलं गोड चटणी, तिखट पाणी लागणारी आंबट गोड चव यामुळे पाणीपुरी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय, नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. असंच जर कोणाला पाणीपुरी प्रचंड आवडत असेल आणि त्या व्यक्तीला चिडवून,दाखवत दाखवत पाणीपुरी खाल्ली तर काय होईल.हे हाल त्या बायकोचे झाले असतील.
When she said tie my hand and do whatever you want https://t.co/MLicJCxyX5
— peek_humour (@peek_humour) October 24, 2026
व्हायरल व्हिडिओमध्ये नवरा बायको दोघं दिसत आहेत. त्यांच्या समोर पाणीपुरी दिसत आहे. नवऱ्याने बायकोचे हात पलंगाला बांधून ठेवले आहेत आणि नवरा तिच्यासमोर तिला न खाऊ घालता स्वत: ताव मारून खातो आहे. पाणीपुरी खायला न मिळणाऱ्या बायकोच्या तोंडावर हावभाव पाहून नेटकऱ्यांना हसू आवरले नाही.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया कोणाच्या बाजूने
या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने म्हटलंय की आता खा आरामात पण जेव्हा तिचे हात खुले होतील, तेव्हा ती तुझे जे हाल करेल ते त्यानंतर पाणी पुरी खायलाही घाबरशील. तर दुसरा नवऱ्याला उद्देशून म्हणतोय ‘ की हेच तुझे शेवटचे जेवण’ या अशा कमेंटमुळे सोशल मीडियावर लोक पोटधरून हसत आहेत.
