AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी त्याच्या प्रेमात वेडी, 100 काय हजार वेळा लग्नासाठी विचारेन..; ट्रोलर्सवर भडकली रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna: रश्मिकाने तिच्या आणि विजयच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना उत्तर देताना, त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला असून ते दोघंही त्यात आनंदी असल्याचं स्पष्ट केलं.

मी त्याच्या प्रेमात वेडी, 100 काय हजार वेळा लग्नासाठी विचारेन..; ट्रोलर्सवर भडकली रश्मिका मंदाना
Rashmika MandannaImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 3:18 PM
Share

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ सिझन 9 मधील त्यांच्या उपस्थितीनंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं. या कार्यक्रमात विजयने रश्मिकाने लग्नासाठी त्याला वारंवार विचारल्याचा किस्सा सांगितला. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी विजयच्या वागण्यावर टीका करत त्याला ‘रेड फ्लॅग’ म्हटलं. आता या टीकेवर रश्मिकाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

कार्यक्रमात रश्मिकाने विजयला लग्नाबद्दल विचारल्याचा प्रसंग सांगितला. तिने लग्नाचा विषय काढल्यानंतर विजयने तिला पुन्हा पुन्हा विचारण्यास सांगितलं होतं. रश्मिकाने जवळपास वर्षभर त्याला लग्नाबद्दल विचारल्याचं सांगितलं. विजयच्या या वक्तव्यावरून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. रश्मिकाला लग्नासाठी वारंवार विनंती करावी लागली, असं चित्र निर्माण होत असल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली. काहींनी विजयच्या बोलण्याला अहंकारी वृत्तीशी जोडत त्याच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या चर्चांदरम्यान रश्मिकाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित तिच्या नात्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

रश्मिकाने या पोस्टच्या सुरुवातीलाच सांगितलं की, ती अशा मतांवर क्वचितच प्रतिक्रिया देते, कारण प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांच्या मुलाखतीनंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यामुळे लोकांना या जोडप्याने नेमकं काय सांगितलं, हे समजून घेण्यापेक्षा कोणाला तरी दोषी ठरवण्यात अधिक रस असल्याचं तिला जाणवलं. तिने स्पष्ट केलं की, त्यांच्यातील संवादाचा विषय कोणाला किती वेळा लग्नासाठी विचारावं लागलं किंवा लग्नाचा निर्णय घेण्यासाठी किती काळ लागला, हा नव्हता. विजयच्या दृष्टीने एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेणं आणि आयुष्यातील चढ-उतारांना एकत्र सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत याची खात्री करणं, हे अधिक महत्त्वाचं होतं.

रश्मिका मंदानाची पोस्ट-

रश्मिकाने सांगितलं की, तिला स्वतःला काय हवं आहे, हे माहीत होतं. तर विजय इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या व्यावहारिक बाजूंचा विचार करण्याला प्राधान्य देत होता. या दोघांच्या विचार करण्याच्या पद्धतीत असलेल्या फरकात तिला काहीही गैर वाटत नाही. ती मनाचं ऐकून निर्णय घेते, तर विजय प्रत्येक गोष्टीचा अधिक विचारपूर्वक दृष्टिकोनातून विचार करतो. आयुष्याकडे पाहण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळेच त्यांचं नातं अधिक चांगल्या प्रकारे जुळून येतं, असं तिचं म्हणणं आहे.

तिने हेही स्पष्ट केलं की, लग्न म्हणजे एखादा भव्य प्रपोजल, अंगठी किंवा नाट्यमय प्रसंग नव्हता. त्यांच्यासाठी एकत्र कोणतं आयुष्य घडवायचं आहे, हे अधिक महत्त्वाचं होतं. आपली भूमिका स्पष्ट करताना तिने लिहिलं, “आणि आम्ही एकमेकांची निवड केली.” विजयबद्दलचं प्रेम तिने उघडपणे व्यक्त करते, यावरून टीका करणाऱ्यांनाही रश्मिकाने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणं ही लोकांच्या चर्चेची बाब का बनली आहे, असा सवाल तिने केला. ती म्हणाली, “आणि हो, मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडी आहे. हे वाईट कधीपासून झालं?”

ती पुढे म्हणाली, “ज्या व्यक्तीशी मी लग्न करत आहे, त्याच्या प्रेमातच मी नसेन, तर मग मी त्याच्याशी लग्न तरी का करावं?” लग्न झाल्यानंतरही विजयशी पुन्हा लग्न करण्याची संधी मिळाली, तरी ती आनंदाने तयार असेल, असंही तिने म्हटलं. तिच्या मते, प्रेम असंच असायला हवं. इतरांना सोयीचं वाटावं म्हणून आपल्या भावना कमी व्यक्त करण्याची तिला गरज वाटत नाही. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं, “आम्ही दोघांनीही स्वतःच्या अटींवर, स्वतःच्या निवडींनी आणि स्वतःच्या मेहनतीने आपलं आयुष्य घडवलं आहे. आम्ही समजूतदार आणि सक्षम प्रौढ व्यक्ती आहोत. आम्हाला कसं जगायचं आणि कोणासोबत आयुष्य घालवायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आणि सौभाग्य आम्हाला लाभलं आहे.”

रश्मिकाने सांगितलं की, जेव्हा तिला विजयची गरज होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता आणि आजही तिला त्याचा आधार मिळतो. ती म्हणाली, “इंटरनेटवर तयार केलेल्या निराधार गोष्टींवर, दिशाभूल करणाऱ्या एडिट्सवर आणि निव्वळ खोट्या कथनांवर काही लोक विश्वास ठेवतात; पण मी माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल जे सांगते, त्यावर विश्वास ठेवत नाहीत. ही गोष्ट खरंच थोडी विचित्र आणि अस्वस्थ करणारी आहे.” विजयसोबतच्या नात्यातील छोट्या, वैयक्तिक क्षणांचाही रश्मिकाने उल्लेख केला. ती आजारी असो, चिंतेचा सामना करत असो किंवा एखादा दिवस कठीण जात असो, अशा वेळी तिच्या मदतीला धावून येणारा व्यक्ती विजयच असतो, असं तिने सांगितलं. तिने लिहिलं, “माझं हाड मोडलं तेव्हा तुम्ही माझ्यासोबत नव्हते, तो होता. दर महिन्याला माझ्या पोटात दुखतं, तेव्हाही तुम्ही नसता, तो असतो. मध्यरात्री चिंतेमुळे माझी झोप उडते, तेव्हाही तुम्ही नसता, तो असतो. जेव्हा मला निराश वाटतं, सल्ल्याची, संरक्षणाची, दिलाशाची किंवा आधाराची गरज असते, तेव्हाही तुम्ही माझ्यासोबत नसता किंवा कधीच नव्हता. तो मात्र असतो.”

सध्या ती आयुष्यातील सर्वांत आनंदी टप्प्यावर असल्याचंही तिने सांगितलं. “सध्या मी माझ्या आयुष्यात कधी नव्हते इतकी आनंदी आहे. माझ्या चेहऱ्यावर, लग्नानंतर मला मिळालेल्या आनंदात, माझ्या अभिनयात, माझ्या चित्रपटांत आणि मी ज्या पद्धतीने आयुष्य जगते त्यातून तुम्हाला हे दिसावं, अशी आशा आहे.” आपल्या भावना व्यक्त करताना तिने पुढे म्हटलं, “मी आनंदी आहे. मी समाधानी आहे. मी कृतज्ञ आहे.”

रश्मिकाने तिच्या कुटुंबीयांवर केल्या जाणाऱ्या टिप्पण्यांनाही विरोध केला. ती म्हणाली, “माझ्या कुटुंबाला न ओळखता त्यांच्याबद्दल बोलणं, हा स्त्रीवाद नाही. स्त्रीवादाचा मुखवटा घातलेली ही छळवणूक आहे.” तिच्या मते, स्त्रीवाद म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं; दुसऱ्याने वेगळा मार्ग निवडला म्हणून त्याला कमी लेखणं नव्हे. स्वतःच्या निर्णयामुळे तिला प्रचंड प्रेम आणि आनंद मिळाला आहे, असंही तिने सांगितलं.

Follow Us
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल