AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Update : रणधीर कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा, निरीक्षणासाठी आयसीयूमध्ये

जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. (Randhir Kapoor's condition improves, In ICU for monitoring)

Health Update : रणधीर कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा, निरीक्षणासाठी आयसीयूमध्ये
रणधीर कपूर
| Updated on: May 01, 2021 | 2:17 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रणधीर कपूर यांना सध्या काही चाचण्या करण्यासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. रिपोर्ट्सनुसार आता रणधीर कपूर यांच्या प्रकृतीत सुधारना होत आहे.

रणधीर कपूर आयसीयूमध्ये

जेव्हा रणधीर यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं तेव्हा ते म्हणाले- रुग्णालयातील प्रत्येकजण माझी काळजी घेत आहे आणि टीना अंबानी यांचेही आभार. सर्व काही नियंत्रणात आहे. प्रत्येकजण माझ्यासाठी खूप काम करत आहे. रणधीर यांना जेव्हा थोडा त्रास जाणवला तेव्हा त्यांनी कोरोनाची चाचणी केली आणि त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह झाला.

मुलगी करीना आणि करिश्मा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला

रणधीर कपूर यांनी करीना आणि करिश्मा यांच्या संपर्कात आल्याचं सांगितलं होतं. या दोघींचीही कोरोना टेस्ट झाली असून त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. संपूर्ण कुटुंब सध्या विलगीकरणात आहे. तर रणधीर कपूर यांच्या सोबतच त्यांच्या कर्मचार्‍यांमधील 5 लोकही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

भावाच्या मालमत्तेवर केवळ आमचा अधिकार!

रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील म्हणाले की, राजीव कपूरच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात. आमच्याकडे त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे नाहीत. आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, ती सापडली नाही. त्यांना घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यापासून सूट देण्यात यावी. यावर न्यायाधीश गौतम म्हणाले की, घटस्फोटाच्या आदेशाची कागदपत्रे सादर न करण्यासाठी सूट देण्यास न्यायालय तयार आहे, परंतु स्वीकृतीपत्र आधी दिले जावे. या प्रकरणातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

भावा-बहिणींना द्यावे लागणार पैसे!

आपल्या वडिलोपार्जित घराविषयी सांगताना रणधीर म्हणाले की, ‘माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, मी या घरात मला जेवढे वाटेल तेवढे दिवस राहू शकतो. परंतु, ज्या दिवशी मी हे घर विकेन, तेव्हा त्यातून मिळणारे पैसे मला ऋषी, राजीव, ऋतु आणि रीमा यांच्यात वाटून घ्यावे लागतील.’

रणधीर यांनी यापूर्वीच वांद्रे येथे घर विकत घेतले आहे आणि तो आता पूर्णपणे तयार झाले आहे. रिपोर्ट्सनुसार रणधीर लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहेत (Randhir Kapoor decided to sell his ancestral house).

संबंधित बातम्या

Akshay Kumar : गर्भवती महिलांच्या मदतीसाठी अक्षय कुमार मैदानात, म्हणतो काळ कठीण, आता….

Photo : ‘आज ब्लू है पानी पानी पानी…’, सोन्या अयोध्याचा हॉट अवतार…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.