Akshay Kumar : गर्भवती महिलांच्या मदतीसाठी अक्षय कुमार मैदानात, म्हणतो काळ कठीण, आता….

अक्षय कुमारनं खास ट्विट करत चाहत्यांसाठी हेल्पलाइन नंबर शेअर केला आहे. (Akshay Kumar in the field to help pregnant women, tweeted time is hard...)

Akshay Kumar : गर्भवती महिलांच्या मदतीसाठी अक्षय कुमार मैदानात, म्हणतो काळ कठीण, आता....
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 1:18 PM

मुंबई : सध्या देशभरात कोरोनानं (Corona) डोकं वर काढलं आहे. देशातील कोरोनाचं संकट अजून वाढताना दिसतंय. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक व्यक्ती शक्य ती आणि शक्य तेवढी मदत करताना दिसत आहेत. कोरोना काळात अनेकांचे हाल होत आहेत एकूणच सगळ्यांची अवस्था वाईट झाली आहे मात्र गरोदर महिला आणि लहान मुलं यांना सुद्धा कोरोनामुळे प्रचंड त्रास झाला आहे. अशात या लोकांच्या मदतीसाठी अक्षय कुमार (Akshay Kumar) पुढे आला आहे.

अभिनेता अक्षय कुमारनं केलं ट्विट  

बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेता अक्षय कुमारनं ट्विट करत महत्त्वाची माहिती नागरिकांशी शेअर केली आहे. गरोदर महिला आणि लहान मुलांना होणाऱ्या त्रासावर त्यानं भाष्य केलं आहे. ‘कोरोना संकटामुळे महिला आणि मुलांवर मोठा परिणाम झाला आहे. यावेळी त्यांना मदत मिळायला हवी. कोणत्याही गर्भवती महिलेला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल तर या हेल्पलाइन नंबर 9354954224 वर कॉल करा.’ अक्षयनं पुढे लिहिलं ‘ज्या मुलांना समुपदेशनाची किंवा मदतीची आवश्यकता असेल त्यांनी 18001212830 कॉल करू शकतो’

अक्षयच्या चित्रपटांची रांग!

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : करण जोहरसोबतच्या वादानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच स्पॉट, पाहा कूल अंदाज

Hotness Alert : आता ‘बीए पास 3’ मध्ये अंकिता चौहानच्या हॉटनेसचा तडका, पाहा फोटो

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.