रणवीरचा ‘83’मधील पहिला लूक पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रणवीर हा 1983 च्या कपिल देव यांच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याने कपिल देव यांच्यासारख्या मिश्या आणि केस ठेवले आहेत. रणवीरचा हा ‘कपिल देव लूक’ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रणवीरने हा लूक त्याच्या आगामी ‘83’ या सिनेमासाठी ठेवला …

रणवीरचा ‘83’मधील पहिला लूक पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रणवीर हा 1983 च्या कपिल देव यांच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याने कपिल देव यांच्यासारख्या मिश्या आणि केस ठेवले आहेत. रणवीरचा हा ‘कपिल देव लूक’ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रणवीरने हा लूक त्याच्या आगामी ‘83’ या सिनेमासाठी ठेवला आहे.

 

View this post on Instagram

 

रेट्रो

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

‘पद्मावत’, ‘गल्ली बॉय’ सारखे हिट सिनेमे दिल्यानंतर आता रणवीर सिंग हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर सेंचुरी मारण्याच्या तयारीत आहे. ‘83’ सिनेमामध्ये तो भारताचे माजी कर्णधार आणि देशाला क्रिकेटमध्ये पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. लवकरच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

‘83’ साठी रणवीर पहिली पसंती नव्हता

रणवीर सिंग हा या सिनेमासाठी पहिली पसंती नव्हता. पिंकविलाच्या वृत्तानुसार, रणवीर सिंग नाही, तर रणदीप हुडा याला या सिनेमातील कपिल देव यांच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होती. यासाठी रणदीप हुडाला हा सिनेमा ऑफर करण्यात आला होता. इतकंच नाही, तर याची घोषणाही करण्यात आली होती. रणदीपचं लूक टेस्ट देखील झालं होतं. मात्र, त्यानंतर ही भूमिका रणवीरच्या नशीबी आली आणि तो या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे.

रणवीरला कपिल देव यांच्याकडून क्रिकेटची ट्रेनिंग

 

View this post on Instagram

 

LEGEND!?? #KapilDev @83thefilm #blessed #journeybegins @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

या सिनेमासाठी खुद्द कपिल देव रणवीरला क्रिकेटचे धडे गीरवत आहेत. यादरम्यानचे धर्मशाळा येथील काही फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोमध्ये कपिल देव हे रणवीरला क्रिकेटसंबंधी काही टिप्स देताना दिसत होते. या सिनेमामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर अनेक काळापासून तयारी करत आहे, या भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेत आहे. रणवीर हा कपिल देव यांच्याकडून क्रिकेट शिकत असल्याने त्याला कपिल देव यांच्या सानिध्यात राहून त्यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या भूमिकेत उतरवण्यात मदत होणार आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंगसोबत चिराग पाटील, साकीब सलीम, पंकज त्रिपाठी, हार्डी संधू हे मुख्य भूमिकेत दिसतील. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *