AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय – रश्मिका करतायेत सीक्रेट डेटिंग? ‘तो’ फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचा अंदाज

विजय - रश्मिका 'त्या' फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा; दोघे का नाही करत नात्याचा स्वीकार?

विजय - रश्मिका करतायेत सीक्रेट डेटिंग? 'तो' फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचा अंदाज
विजय - रश्मिका करतायेत सीक्रेट डेटिंग? 'तो' फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचा अंदाज
| Updated on: Jan 04, 2023 | 2:19 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या कामापेक्षा अधिक त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा तुफान रंगलेली असते. एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत कोणाचं नाव जोडण्यात आलं, तर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा जोर धरु लागतात. यासर्व रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर करतात. तर काही मात्र त्यांचं खासगी आयुष्य गुपित ठेवतात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना.

गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांही कायम त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळतात. सध्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघांचा फोटो कोलाज केलेला दिसत आहे.

फोटोमध्ये एका ठिकणी विजय दिसत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी रश्मिका दिसत आहे. फोटोमध्ये चाहत्यांचं लक्ष केंद्रीत करणारी गोष्ट म्हणजे दोघे एकाच ठिकाणी असल्याचं दिसत आहे. फोटो व्हायरल होताच दोघांनी नव्या वर्षाचं स्वागत मालदीवमध्ये केल्याचा संशय चाहत्यांनी व्यक्त केला.

सांगायचं झालं तर, विजय-रश्मिका दोघांनी नव्या वर्षाचं स्वागत मालदीवमध्ये केलं. पण दोघांनी याबद्दल चाहत्यांना सांगितलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे दोघांची जोडी चाहत्यांना रिल आणि रियल आयुष्यात देखील आवडते. दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

एवढंच नाही, तर दोघांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिल्या. खास फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘एक वर्ष जे काही क्षणांसाठी कायम खास राहिल… जेव्हा आपण एकत्र हासलो, गुपचूप रडलो, स्वप्नाचा पाठलाग केला, काही गोष्टी जिंकलो, तर काही गमावलं…. सर्व क्षण साजरा करण्याची गरज आहे… कारण हे आयुष्य आहे…’ असं खास कॅप्शन अभिनेत्याने लिहिलं.

एक फोटो पोस्ट करत रश्मिकाने कॅप्शनमध्ये, ‘Hello 2023…’ असं लिहिलं आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी प्रचंड आवडते. पण दोघे कधी त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर करतील? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...