AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

53 व्या वर्षी मराठी अभिनेत्री थाटणार दुसऱ्यांदा संसार? लग्नाला यायचं हा…म्हणत पत्रिकाही वाटल्या, Video Viral

अभिनेत्री रेशम टिपनीस जिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिला श्रीमान हवा, ती श्रीमानच्या शोधात असल्याचे कबूल केले आहे.

53 व्या वर्षी मराठी अभिनेत्री थाटणार दुसऱ्यांदा संसार? लग्नाला यायचं हा...म्हणत पत्रिकाही वाटल्या, Video Viral
| Updated on: Oct 18, 2026 | 11:41 AM
Share

Resham Tipnis Viral Video: अभिनेत्री रेशम टिपनीस जिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिला श्रीमान हवा, ती श्रीमानच्या शोधात असल्याचे कबूल केले आहे. रेशमने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्याला 3 दिवस गेले नाही, तोच तिने आता थेट लग्नाची पत्रिकाच दाखवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेशम टिपनीसचा हा नवा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

रेशम व्हायरल व्हिडीओत म्हणाली, ” मी इंडिपेंडेंट वुमन, स्ट्राँग वुमन आहे. म्हणजे अनेक वेळा मी धडपडलीये, परत स्वतःला सांभाळलंयही आणि पुन्हा काम सुरू केले आहे. पण आता एक काहीतरी वाटतंय मला की, दिवसाअखेर जेव्हा मी घरी जाते आणि दरवाजा उघडते आणि माझी वाट बघणारं कोणीच नसतं. म्हणजे आता असे वाटायला लागलंय की, यार कोणीतरी पाहिजे होतं ना, जो बेल वाजल्यावर दरवाजा उघडेल, एक छान वॉर्म हग देईल आणि एक गरमागरम कॉफी देईल. मग आपला दिवस कसा गेला, हे मी त्याला सांगेन, तो शांतपणे ते ऐकून घेईल. असा कोणीतरी आता हवा ना. मी त्याच श्रीमानच्या शोधात आहे. सो… विश मी गुड लक की माझा श्रीमान मला लवकरच भेटेल!”

रेशमचा हा व्हिडीओ पाहिल्यावर ती पुन्हा लग्न करते की काय? अशी चर्चा रंगली आहे. आता तर रेशमने एक दिवसापूर्वी लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर श्रीमान, श्रीमती असं नाव लिहिलेलं होतं आणि आमच्या लग्नाला यायचं हा… असं लिहिलेलं दिसत आहे. रेशमने ही पत्रिका देवासमोर ठेवली आणि देवाचे आशीर्वादही घेतले हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

रेशम टिपणीसने विनोदी तसेच गंभीर भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिने अनेक मराठी, हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये ‘बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधून ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. ती या शोमध्ये सेमीफायनलिस्टपर्यंत पोहोचली होती. या शोमध्ये तिचे पर्सनल आयुष्य चर्चेचा विषय बनले होते. वयाच्या 20 व्या वर्षी 1993 साली तिने अभिनेते संजीव सेठशी लग्न केले होते. पण 2004 मध्ये त्यांचा वेगळे झाले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगीचे नाव रिशिका मुलाचे नाव मानव आहे. ज्यांचा सांभाळ ती एकटीने करत आहेत.

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर